ध्यास विश्वसार्ह बातमीचा

टीम इंडियाला आयसीसीकडून मोठा झटका

नवी दिल्ली वृत्तसंस्था 

5 ते 11 डिसेंबर दरम्यान वूमन्स ऑस्ट्रेलिया विरुद्ध वूमन्स टीम इंडिया यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. यजमान ऑस्ट्रेलियाने या मालिकेत टीम इंडियाचा सुपडा साफ केला. ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाला 3-0 ने क्लिन स्वीप केलं. टीम इंडियाला या मालिका पराभवानंतर मोठा झटका लागला आहे. आयसीसीने टीम इंडियावर मोठी कारवाई केली आहे. आयसीसीने या कारवाईबाबतची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे.

आयसीसीने टीम इंडियावर स्लो ओव्हर रेटमुळे कारवाई केली आहे. टीम इंडिया दुसऱ्या सामन्यात ओव्हर रेट कायम राखण्यात अपयशी ठरली. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. नियमांनुसार, एका तासात ठराविक ओव्हर टाकणं बंधनकारक असतं. मात्र टीम इंडिया तसं करु शकली नाही. त्यामुळे आयसीसीने कारवाई केली.

उभयसंघात ब्रिस्बेनमध्ये 8 डिसेंबर रोजी दुसरा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाला निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ लागला. त्यामुळे मॅच रेफरी डेव्हिड गिल्बर्ट यांनी ही कारवाई केली. टीम इंडियाकडून निर्धारित वेळेत 2 ओव्हर कमी टाकल्या गेल्या. त्यामुळे सामन्याच्या एकूण मानधनाच्या 10 टक्के रक्कम ही दंड म्हणून द्यावी लागणार आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हीने झालेली चूक मान्य केली. त्यामुळे अधिकृत सुनावणीची गरज पडली नाही. आयसीसी संहितेच्या अनुच्छेद 2.22 चं टीम इंडियाकडून उल्लंघन झालं. अनुच्छेद 2.22 मध्ये स्लो ओव्हर रेटसाठी कारवाईची तरतूद आहे. तसेच त्यानुसार प्रत्येक ओव्हरसाठी 5 टक्के रक्कम इतका दंड ठोठावण्याची तरतूद आहे. टीम इंडिया वेळेत 2 ओव्हर पूर्ण करु शकली नाही. त्यामुळे टीम इंडियाला 10 टक्के दंड ठोठावण्यात आला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर दुसऱ्या सामन्यात 122 धावांनी विजय मिळवून मालिकेवर नाव कोरलं होतं. ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 372 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडिया 249 धावांवर ढेर झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!