ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ग्रामीण भागातील जनतेमध्ये कोविड प्रतिबंधात्मक मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी : डॉ अर्जुन गुंडे

सोलापूर : आज दिनांक 9 मार्च 2021 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद सोलापूर येथे कोरोना नियंत्रणसाठी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी व गट शिक्षण अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीमध्ये प्रत्येक गावातील कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्यासाठी जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी व माझे गाव कोरोना मुक्त गाव ही मोहीम संयुक्तपणे राबविण्यात यावी व तालुकास्तरावरील खाजगी डॉक्टर व औषधे विक्रेत्यांची बैठक घेण्यात यावी व त्यामध्ये त्यांना लसीकरण कोविड प्रतिबंध करण्याबद्दल सुचना द्यावी. व दुकानदार, दूधवाले, भाजीवाले या सर्वांचे कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी तालुकास्तरावर टास्क फोर्सची समिती स्थापन करण्यात यावी व प्रत्येक समितीमध्ये तालुक्याचा प्रतिबंधात्मक आढावा घेण्यात यावा अशा सक्त सूचना देण्यात आल्या. सदर मोहीम मध्ये अधिकारी व कर्मचारी यांनी दिलेली जबाबदारी वेळेत न पार पाडल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. अशा सुचना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या.

याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्‍वर राऊत वित्त व लेखा अधिकारी अजयसिह पवार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कुमार जाधव जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रदीप ढेले शिक्षणाधिकारी बाबर लसीकरण समन्वयक डॉ अनिरुद्ध पिंपळे व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!