बाबासाहेब तानवडे यांनी कठीण प्रसंगातून भाजपचे काम केले : दत्ता शिंदे
पुण्यतिथीनिमित्त अक्कलकोटमध्ये विविध कार्यक्रम
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
स्वर्गीय आमदार बाबासाहेब तानवडे यांच्याकडे विकासाचा दूरदृष्टीकोन होता म्हणून एकरूख आणि देगाव एक्सप्रेस सारख्या योजना पुढे आल्या आज त्या फलद्रुप होण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांची त्यावेळसची दृष्टी आहे शिंदे आणि तानवडे परिवार यांचे संबंध फार जुने आहेत पूर्वीपासूनच या मंडळींनी विकासाभिमुख दृष्टिकोन ठेवून राजकारण केले,असे प्रतिपादन गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी केले.
गुरुवारी,जनसेवक आमदार बाबासाहेब तानवडे व लोकनेते दत्ताअण्णा तानवडे यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष मल्लिनाथ स्वामी हे होते.पुढे बोलताना शिंदे म्हणाले, तालुक्यात भाजपचा इतिहास काढून पाहिला तर सगळ्यात आधी तीन परिवाराची नावे समोर येतात ती म्हणजे स्व.आमदार बाबासाहेब तानवडे, स्व.पंचपा कल्याणशेट्टी आणि आमचे वडील भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बलभीम शिंदे या सर्वांनी मिळून त्या काळात कठीण प्रसंगाला सामोरे जाऊन पक्ष वाढवला.हे सर्व जुन्या मंडळींना माहिती आहे.या लोकांनी स्वतःचा विचार कधी केला नाही म्हणून पक्षाचे विचार आज चांगल्या पद्धतीने पुढे जात आहेत.आज आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन तालुक्यात विकासाची गंगा आणत आहेत अनेक मोठी कामे चालू आहेत तालुक्यात सध्या भाजपची असल्याने विकासाचा हा रथ वेगाने पुढे जात आहे. शिंदे परिवार आणि तानवडे परिवार यांचे संबंध फार जुने आहेत अगदी मी एकदम लहान होतो त्यावेळपासून मी तानवडे परिवाराला जवळून पाहतो या परिवाराला माजी आमदार तानवडे यांच्या विचारांचा वारसा आहे तो त्यांनी तसाच पुढे चालू ठेवावा आणि या तालुक्यातील विकासकामे जमेल त्या पद्धतीने मार्गी लावावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कुरनूर धरण, एकरूख उपसा सिंचन योजना, देगाव एक्सप्रेस यासारख्या महत्त्वाकांक्षी योजना या स्वर्गीय आमदार बाबासाहेब तानवडे यांच्यामुळे पुढे आल्या त्यांच्यामुळे आज तालुक्यातील सिंचन क्षेत्रांमध्ये वाढ झाली हे कोणी नाकारू शकत नाही त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच या दोघांना खरी श्रद्धांजली ठरेल,असे शिंदे यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
प्रस्ताविकात बोलताना आनंद तानवडे म्हणाले, पहिल्यांदा ज्यावेळी तालुक्यात भाजपची सत्ता आली त्यावेळी खूप कठीण परिस्थिती होती अशा काळामध्ये बाबासाहेब तानवडे यांनी काम केले त्यावेळी त्यांना सिद्धाराम येरगुंटे, मल्लिनाथ स्वामी, संजय देशमुख सारख्या अनेक लोकांनी सहकार्य केले. माझे काम जे पुढे जात आहे त्यांच्या त्यागाचा हा एक भागच आहे हा वारसा आम्ही पुढेही असाच चालू
ठेवु, असे अभिवचन त्यांनी उपस्थितांना दिले.बाळासाहेब मोरे यांनी एकरूख उपसा सिंचन योजना,कुरनूर धरणाची निर्मिती याचा इतिहास समजून सांगितला आणि आणि धरणाला बाबासाहेब तानवडे यांचे नाव देण्याची मागणी केली.संजय देशमुख यांनी तानवडे परिवाराने भाजपसाठी आणि तालुक्यासाठी केलेल्या कार्याची माहिती सांगून त्यांचे कार्य तालुका कदापि विसरणार नाही हे सांगताना त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा मोठा गौरव केला.प्रारंभी या मेळाव्याचे उद्घाटन तानवडे बंधूंच्या प्रतिमेचे पूजन करून झाले.यावेळी तालुक्यातील अनेक मान्यवरांनी तानवडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.यानिमित्ताने पार पडलेल्या आरोग्य शिबिरात १०२ जणांची तपासणी करण्यात आली.दंत तपासणी शिबिरात ६० जणांची तपासणी करण्यात आली.रक्तदान शिबिर घेण्यात आले.
यात ७१ जणांनी रक्तदान केले.कार्यक्रमास खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी,महिबूब मुल्ला, तुकाराम बिराजदार, बाळासाहेब मोरे,संजय क्षीरसागर, चंद्रकांत इंगळे,अविनाश मडीखांबे, संजय देशमुख,शिवशरण जोजन,दिलीप सिद्धे, महेश हिंडोळे,बसलिंगप्पा खेडगी,आप्पासाहेब पाटील,कुमारप्पा पाटील,बसवराज बाणेगाव, अप्पू परमशेट्टी, अजय मुकणार,परमेश्वर यादवाड,दयानंद उंबरजे,विलास गव्हाणे,श्रीशैल ठोंबरे,शाम स्वामी, सिद्धाराम मठपती,सुनील कटारे, दत्तात्रय माडकर,रमेश उप्पीन,नागप्पा करपे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण तानवडे ,प्रशांत तानवडे, अजित तानवडे,विजयकुमार तानवडे, बसवराज तानवडे,ऍड.अमित कोथिंबीरे, सुनील आवळे,रफिक मुल्ला, विठ्ठल कत्ते,शिवानंद पटणे, दत्ता पारशेट्टी संगप्पा चानकोटे,रेवणसिध्द बिराजदार, डॉ.दयानंद कुडले,विजयकुमार बिराजदार आदींनी प्रयत्न केले.
शिवकिर्तन सोहळ्याला चांगला प्रतिसाद
शिरवळ (ता. अक्कलकोट) येथे श्री म.नि.प्र. बसवलिंग महास्वामीजी (अक्कलकोट) व मातोश्री प.पू. जगदेवीताई भद्रेश्वर मठ यांच्या दिव्य सानिध्यात शि.भ.प महादेवीताई मठपती खैराटकर यांचे शिवकिर्तन पार पडले.या कार्यक्रमास सरपंच आशाबाई बिराजदार, उपसरपंच मनीषा दूधभाते आदी मान्यवर उपस्थित होते.हे किर्तन सोहळ्यालाही ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला.