अक्कलकोट : कै.बाळासाहेबांनी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या माध्यमातून आयुष्यभर जनकल्याणाची कामे केली आहेत. ट्रस्टच्या माध्यमातून भाविकांना सोयीसुविधा पुरविण्याबरोबरच रुग्णसेवेसाठी रुग्णालयाची निर्मीती केली. संपुर्ण जीवन स्वामी सेवेबरोबरच वटवृक्ष मंदीरातील भाविकांच्या सेवेकरीता समर्पित केले. हे कार्य स्वामी सेवक कै.बाळासाहेब इंगळे यांनी वटवृक्ष मंदिर समितीवर कार्यरत असताना स्वामी सेवेचे धेय बाळगून केले आहे. तह्यात जीवनात त्यांनी पहाटे ४ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत अनेक भाविकांच्या सेवेकरीता, मंदीर समितीत कार्यालयीन व धार्मिक कामकाजातील पारदर्शकपणा कसा टिकून राहिल याकरीता वेळ व्यतीत केला. आम्ही पाहत होतो जसजसे त्यांचे वय वाढत होते तस तशी त्यांची काम करण्याचा हुरूप आणखीन वाढत होता. त्यामुळे अक्कलकोट निमशहरी सारख्या ग्रामीण भागात तंत्रशिक्षणाची संकल्पना देखील कोणाच्याही विचाराधीन नसताना श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान प्रमुख या नात्याने बाळासाहेबांनी तंत्रनिकेतन महाविद्यालयाची संकल्पना व्यक्त केली. बाळासाहेबांचे एक तत्व होते. उद्याचे काम आज आजचे काम आता या तत्त्वानुसार त्यांनी नुसते संकल्प करून न थांबता अल्पावधीतच आज आपल्या या तंत्रनिकेतन महाविद्यालयाची निर्मिती करून तालुक्यातील अनेक तंत्रशिक्षण इच्छुक विद्यार्थ्यांची मोठीच गैरसोय दूर केली. अक्कलकोट सारख्या ठिकाणीही तंत्रशिक्षणाची प्रणाली राबविता येते हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखविले, म्हणून संपूर्ण जीवन श्री स्वामी समर्थांच्या सेवेत व्यतीत करीतच अध्यात्माची कास धरून चालणारे बाळासाहेब यांचे जीवन प्रवास म्हणजे अध्यात्म ते तंत्रज्ञान असा थक्क करणारा जीवन प्रवास असल्याचे प्रतिपादन आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व कलर्स मराठी वाहिनी वरील जय जय स्वामी समर्थ मालिकेतील स्वामी समर्थांच्या भूमिकेतील कलाकार अक्षय मुडावदकर यांनी केले. ते कै.कल्याणराव उर्फ बाळासाहेबांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमीत्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयातील बाळासाहेबांच्या अर्धपुतळ्यास व कै.उमेश इंगळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात निरूपण करताना बोलत होते.
प्रारंभी स्वामी समर्थ फेम अक्षय मुडावदकर व प.पू.अण्णू महाराज, डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले, अमोलराजे भोसले आदी मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेस पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे प.पू.अण्णू महाराज, स्वामींच्या भूमिकेतील मुख्य कलाकार अक्षय मुडावदकर, विश्व अग्निहोत्र फौंडेशनचे व गुरु मंदीर बाळप्पा महाराज मठाचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, कलाकार अनुज ठाकरे, कराड येथील हुतात्मा बहुउद्देशीय अपंग कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुनील फडतरे, मंदिर समितीचे सेक्रेटरी आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य नागनाथ जेऊरे, प्रथमेश इंगळे आदी उपस्थित होते. तत्पूर्वी सर्व मान्यवरांचा सत्कार मंदीर समितीचे महाविद्यालयाचे व कार्यक्रमाचे चेअरमन महेश इंगळे यांनी केला. तत्पूर्वी कै.बाळासाहेबांच्या सातव्या पुण्यस्मरण दिन निमित्ताने स्वामी समर्थ फेम अक्षय मुडावदकर व मान्यवरांच्या हस्ते रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, रोजगार मेळावा, गुणीजनांचा सन्मान व सत्कार, माजी विद्यार्थी मेळावा आदी विविध कार्यक्रमाचेही उदघाटन करण्यात आले.
यानंतर हुतात्मा बहुउद्देशीय अपंग कल्याणकारी संस्थेच्या वतीने रायगड येथील समाजसेवक डॉ.तोजोदिन हाफिज, गोव्यातील मडगाव स्वामी समर्थ मंदिराचे अध्यक्ष जयेश नाईक, समाजसेवक उद्योजक चिपळूण येथील डॉ.विजय माटे, कराड येथील समाजसेवक डॉ.संजय भागवत आदींसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना अक्कलकोट भूषण पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी करमाळ्यातील यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेशभाऊ करे-पाटील यांना समाजरत्न पुरस्कार, तर पक्षी मित्र व पर्यावरण प्रेमी प्रा.कल्याणराव साळुंके यांचा निसर्ग सेवा गौरव पुरस्कार देऊन विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम व पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्रा.नागनाथ जेऊरे यांनी तंत्र निकेतन महाविद्यालयाचा चढता आलेख विशद केला. प्रारंभी १६५ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाने प्रारंभ झालेले या तंत्र निकेतनमध्ये आज ७५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या तंत्र निकेतन विद्यालयामध्ये अनेक विध्यार्थी घडले आहेत. यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून कै. बाळासाहेबांना अभिवादन केले.
या पुण्य स्मरणानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ११७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. होप फॉर होपलेस सर्व रोग निदान मोफत होमिओपॅथिक व नाडी तज्ञांच्या आरोग्य शिबिराचा जवळपास ६८१ रूग्णांनी लाभ घेतला. याप्रसंगी सर्व शिबिरार्थी, आप्तेष्ट, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व प्रमुख पाहुण्यांना स्वरूची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
आज दिवसभरात डिसले गुरुजी, माळशीरसचे विजयसिंह देशमुख, शीतल शिराळ, राजेश निलवाणी, मनोज इंगोले, डॉ.मल्लीनाथ बोधले, प्रसाद काळे, राजू एकबोटे, अमर पाटील, बाळासाहेब घाटगे, प्रा.शिवाजीराव पाटील, रवि कदम, अरविंद पाटील, संजय पाठक, अविनाश मडीखांबे, स्वामीराव मोरे, संतोष पराणे, काका सुतार, बाबा मालक सुरवसे, श्रीकांत झिपरे, खाजप्पा झंपले, संतोष जमगे, स्वामीनाथ लोणारी, महेश देसाई, सागर गोंडाळ, रवी मलवे, श्रीकांत मलवे, दीपक जरीपटके, ज्ञानेश्वर भोसले, तम्मा शेळके, महेश गायकवाड, प्रसाद सोनार, श्रीशैल गवंडी, स्वामीनाथ चव्हाण, सुनील पवार, पिंटू सोनटक्के, गिरीश पवार, ऋषिकेश लोणारी, रामचंद्र समाणे, सैदप्पा इंगळे, दादा सावंत,आदींसह महाविद्यालयाचे उपप्राचार्य विजय पवार, विभाग प्रमुख मल्लू माने, वैजनाथ खिलारी, धीरज जनगोंडा, शशिकांत परमशेट्टी, राघवेंद्र सावकार, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व अनेक नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.काशिनाथ घुरघुरे, प्रा. शिवशरण अचलेर यांनी केले तर आभार प्रा. नागनाथ जेऊरे यांनी मानले.