नाशिक : वृत्तसंस्था
नाशिक येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा मोठय उत्साहात सुरु झाला आहे. यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उदघाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंड भरून कौतुक केले आहे.
यावेळी शिंदे म्हणाले,”मालदीवमध्ये मोदींविषयी आक्षेपार्य टिपण्णी केल्यामुळे भूकंप झाला. देशाला वाईट नजरेने पाहण्याची हिंमत आज कोणामध्येच नाही. हे केवळ मोदींमुळे शक्य आहे. आज जगभरात आपल्या देशाचे नाव अभिमानाने घेतले जाते. जगभरात मोदींना मिळत असलेला सन्मान पाहून आनंद होतो. यावरूनच आपला देश महासत्ताच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट होते. देशाला तिसरी महासत्ता करण्याचा मोदींचा प्रयत्न आहे”, असे शिंदे म्हणाले.
तसेच ”भगवान राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या चरण स्पर्शाने पवित्र झालेल्या भूमीवर आज मोदी आले. ही आमच्यासाठी गौरवीची बाब आहे. तर अयोध्येत होणाऱ्या सोहळ्याचा हा शुभ संकेत आहे. अयोध्येत राम मंदिराच्या निर्मितीचे रामभक्तांचे आणि बाळासाहेबांचे स्वप्न मोदींनी पूर्ण केले. त्यामुळे त्यांचे अभिनंदन. शब्दांत भावना व्यक्त करणे कठीण आहे. पण मोदी है तो मुमकिन ह”, असे म्हणत शिंदेंनी मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.