मुंबई वृत्तसंस्था
मुंबई शहरातील वांद्रे टर्मिनसवर धक्कादायक घटना घडली आहे. येथे रेल्वे स्थानकावर प्रवाशांमध्ये चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत तब्बल एकूण 9 जण जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चेंगराचेंगरीची ही घटना वांद्रे टर्मिनसवर घडली. सकाळी सहा वाजता हा प्रकार घडला. वांद्रे टर्मिसवरून पहाटे गोरखपूरला जाणारी रेल्वे लागते. ही रेल्वे पूर्णपणे अनारक्षित असते. म्हणूनच या रेल्वेला मोठ्या प्रमाणात प्रवाशी गर्दी करतात. प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशला जाणारे प्रवासी या रेल्वेतून प्रवास करतात. दिवाळी आणि छट पूजा हे सण उत्तरेतील राज्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. हे सण कुटुंबासोबत साजरे करावेत म्हणून मुंबईत कामाला आलेले उत्तर भारतीय या सणानिमित्त आपापल्या गावी जातात. गोरखपूरला जाणाऱ्या या रेल्वेतून प्रवास करण्यासाठी असेच प्रवासी वांद्रे टर्मिनस रेल्वे स्थानकावर गेले होते. मात्र ही रेल्वे उभी असलेल्या प्लॅटफॉर्मवर चेंगराचेंगरी झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, गोरखपूरला जाणाऱ्या या रेल्वेत बसण्यासाठी प्रवाशांनी एकच गर्दी केली होती. यावेळीच चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत एकूण नऊ जण जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. विशेष म्हणजे चेंगराचेंगरीची ही घटना इतकी गंभीर होती, की जखमी झालेले प्रवाशांची स्थिती फारच हृदयद्रावक झाली आहे. जखमी झालेल्या प्रवाशांमधील एकाची तर थेट मांडी फाटली आहे. आणखी एका प्रवाशाचा हात तुटला आहे. चेंगराचेंगरीत काही प्रवाशांचे कपडेही फाटले आहेत. एका प्रावाशाच्या कंबरेला मार लागल्याचे दिसत आहे. ही चेंगराचेंगरी इतकी भीषण होती की प्रवाशांचे खूप सारे रक्त प्लॅटफॉर्मवर सांडलेले दिसत आहे.