ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कमिशनशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगा !

आजचे राशिभविष्य दि.१६ जानेवारी २०२५

मेष : आज तुमचे लक्ष आर्थिक बाबींवर असेल. ग्रहमान अनुकूल आहे. जवळचे मित्र आणि नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. वैयक्तिक कामांबरोबरच कौटुंबिक व्यवस्थेकडे लक्ष देणे महत्वाचे ठरेल. व्यवसायाच्या ठिकाणी तुमची उपस्थिती आवश्यक असेल.

वृषभ : आज नवीन उपक्रमात सहभागी होण्‍याची संधी मिळेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होईल. मित्र आणि नातेवाईकांशी संबंध बिघडू नयेत याची काळजी घ्या.

मिथुन : आज कोणताही निर्णय घेताना व्‍यावहारिक दृष्‍टीकोन ठेवा. स्‍वत: क्षमतेवर विश्वास ठेवून काम केल्याने तुमच्या अनेक समस्या सोडवता येतील. कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळा. तणावाचा तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. व्यवसायाशी संबंधित कामांमध्ये सकारात्मक परिणाम मिळतील.

कर्क : आत्मविश्वासाने तुम्ही ध्येय साध्य करू शकाल. धार्मिक आणि सांस्‍कृतिक कार्यात सहभागी व्‍हाल. मार्केटिंगशी संबंधित कामांमध्ये व्यस्त राहाल.

सिंह : आज घेतलेला कोणताही विवेकी निर्णय नजीकच्या भविष्यात फायदेशीर ठरू शकतो. रागावर नियंत्रण ठेवा, अन्‍यथा जवळच्या लोकांशी संबंधात कटुता निर्माणा होईल. जमिनीशी संबंधित काम रखडण्‍याची शक्‍यता.

कन्या : आज ग्रहांची स्थिती तुमचे मनोबल वाढविण्यास मदत करेल. फोन कॉलव्‍दारे महत्त्वाची सूचना मिळू शकते. भावंडांशी किंवा जवळच्या नातेवाईकांशी वाद टाळा. जोडीदार आणि नातेवाईकांचे सहकार्य आणि सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

तूळ : आज संपर्कक्षेत्रात वाढ होईल. व्यक्तिमत्वात चांगले बदल होतील. न्‍यायालयातील प्रलंबित प्रकरणात निर्णय तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. मुलांसोबत आणि कुटुंबासोबत वेळ व्‍यतित कराल. आर्थिक बाजू चांगली ठेवण्यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे.

वृश्चिक : आज तुमच्या वैयक्तिक बाबी कोणासमोरही उघड करू नका. खूप कठीण काम पूर्ण झाल्‍याने मोठा दिलासा मिळेल. मौल्‍यवान वस्तू, कागदपत्रे जपा. व्यवसायिक कामे व्यवस्थित चालतील.

धनु : काही खास लोकांशी संपर्क साधल्याने तुमची विचार करण्याची पद्धत देखील सकारात्मक बदलेल. जवळच्या व्यक्तीकडून तुमच्यावर टीका केल्याने तुम्हाला निराशा येऊ शकते. कोणावरही जास्त अवलंबून राहू नका. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता राखणे आवश्‍यक.

मकर : आज कोणत्याही दीर्घकाळ चाललेल्या चिंता दूर होऊ शकतात. अनुभवी व्यक्तीशी चर्चा करून योग्य उपाय शोधता येईल. तुमच्या सकारात्मक विचारसरणीमुळे तुमच्यासाठी नवीन यश निर्माण होईल. कोणत्‍याही परिस्‍थितीत रागाऐवजी शांततेने परिस्थिती सांभाळा.

कुंभ : आज इतरांना मदत करण्‍यात तुम्‍ही पुढाकार घ्‍याल. नातेवाईक आणि समाजात तुमच्‍याविषयी आदर वाढेल. भावनेच्‍या आहारी जावू नका. चिडचिडेपणामुळे परिस्थिती बिकट होऊ शकते, याची जाणीव ठेवा. कमिशनशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगा.

मीन : कठोर परिश्रमाच्‍या जोरावर कठीण काम साध्य कराल. संवादाद्वारे अनेक समस्या सोडवल्या जातील. मनाविरुद्ध घटना घडली तरी परिस्‍थिती बिघडू देवू नका. तरुणाईला रोजगाराची संधी मिळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!