---Advertisement---

बेळगावच्या पालकमंत्र्यांवर लैंगिक अत्याचाराचा आरोप; व्हिडीओ व्हायरल

Follow Us:
---Advertisement---

बेळगाव : महाराष्ट्रात एकीकडे शिवसेनेचे मंत्री संजय राठोडला पूजा चव्हाण प्रकरणात राजीनामा द्यावा लागला असताना दुसऱ्या बाजूला कर्नाटकच्या भाजपच्या मंत्र्याचा एका तरुणीसोबत लगट करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे कर्नाटकात एकच खळबळ उडाली आहे.

रमेश जारकीहोळी यांनी नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका युवतीचा लैंगिक छळ केल्याची तक्रार बंगळूर पोलिसांत करण्यात आली आहे. लैंगिक छळाची एक चित्रफितही (सीडी) पुरावा म्हणून सादर करण्यात आला आहे. सदर सीडी मंगळवारी सायंकाळी वृत्तवाहिन्या आणि समाजमाध्यमांमध्ये व्हायरल करण्यात आली आहे.

लैंगिक छळाची तक्रार माहिती हक्क् कार्यकर्ते दिनेश कलहळ्ळी यांनी केली असून, ती युवतीही उत्तर कर्नाटकातीलच आहे, असे तक्रारीत म्हणण्यात आले आहे. शिवाय युवतीच्या पालकांना धमकी देण्यात आल्याचाही आरोप आहे. नागरी हक्क् समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी मंगळवारी सायंकाळी बंगळूर पोलिस आयुक्तांची भेट घेतली. त्यांच्याकडे सीडी देऊन पत्रकारांशी बोलताना त्यांनी या सीडीमधील चित्रणाची माहिती दिली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!