ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लाडक्या बहिणींची बस 40 फूट खोल कोसळली ; १९ महिला जखमी !

रायगड : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक शहरात महायुती सरकारच्या लाडकी बहिण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून नुकतेच माणगांव येथील लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्यासाठी निघालेल्या लाडक्या बहिणींच्या बसला मांजरोणे घाटात ?अपघात झाला. ब्रेक फेल झाल्याने बस घाटात 40 फूट खोल कोसळली. यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली तर अन्य 19 महिला किरकोळ जखमी झाल्या.

माणगावात बुधवारी (9 ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 3 वाजता आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी संपूर्ण रायगड जिल्ह्यासह, पुणे, मुंबई, ठाणे येथून लाडक्या बहिणी बसेसद्वारे दाखल झाल्या आहेत. माणगांव तालुक्यातील रानवडे येथील लाडक्या बहिणींना घेऊन येणारी बस दुपारी 12. 45 वाजण्याच्या सुमारास मांजरोणे घाटात सुमारे 40 फूट कोसळली. ब्रेक निकामी होऊन चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खाली गेल्याचे समजत आहे. या अपघातात महिला जखमी झाल्या असून एका महिलेच्या पायाला दुखापत झाली असून दुसरी महिला बसच्या खिडकीतून बाहेर फेकली गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र महिला जखमी झाल्या आहेत.

जखमी महिलांना गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. रायगडमधील या कार्यक्रमासाठी येणार्‍या बसला गोरेगावमध्ये अपघात झाला आहे. एक एसटी बस घसरली आहे. या सर्व महिलांवर तात्काळ उपचार करून त्यांना सुखरूप घरी पोहोचवावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!