ध्यास विश्वसार्ह बातमीचा

इंधन दरवाढ विरोधात आज व्यापाऱ्यांचा भारत बंद; ८ कोटी छोटे व्यवसायिक होणार सहभागी

नवी दिल्ली : डिझेल-पेट्रोलच्या वाढत्या दरांविरोधात आज शुक्रवार २६ फेब्रुवारी रोजी भारत बंद पुकारण्यात आला आहे. या भारत बंदमध्ये सुमारे ८ कोटी छोटे व्यवसायिक सहभागी होतील असा अंदाज व्यक्त केली जात आहे.

अखिल भारतीय व्यापारी महासंघाने २६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक दिली आहे. आज सर्व व्यावसायिक बाजारपेठा बंद राहतील. माल वाहतूक क्षेत्रातील सर्वात मोठी संघटना ऑल इंडिया ट्रान्सपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनने व्यापाऱ्यांच्या समर्थनार्थ सकाळी ६ ते संध्याकाळी ८ या वेळेत चक्का जाम जाहीर केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!