---Advertisement---

दुधनी पोटनिवडणूक; भाजपच्या तक्रारीवरून ४८ मतदार झाले कमी

Follow Us:
---Advertisement---

दुधनी दि.२५: अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील नगरपालिकेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुक होत आहे. त्यासाठी प्रशासनाने तयार केलेल्या प्रारूप मतदार यादीवर नगरसेवक महेश पाटील, बसवराज हौदे आणि हणमंत कलशेट्टी या तिघांनी हरकत घेतले होते. त्याचे दखल घेऊन प्रशासनाने दुरुस्ती केली. यामुळे तक्रारदारामधून समाधान व्यक्त होत आहे.

दुधनीचे कोणतेही निवडणूक असो चर्चा आणि तक्रार होतच असते. त्याचप्रमाणे सध्या कै.सातलींगप्पा म्हेत्रे यांचे निधन झाल्याने प्रभाग एक मधील नगरसेवकाचे एक जागा रिक्त झालेले आहे. त्याजागेसाठी पोटनिवडणुक होत आहे. त्याचे प्रारूप मतदार यादी मागील आठवड्यात प्रशासनाने तयार केली होती. त्यावर नगरसेवक महेश पाटील, व बसवराज हौदे, हणमंत कलशेट्टी या तिघांनी वेगवेगळे तक्रारीचे अर्ज दाखल केले होते. त्यावर बुधवारी दुपारी ३ वाजता दुधनी नगरपालिका येथे मुख्याधिकारी आतिष वाळूंजे यांच्या समोर सुनावणी झाली. त्यामध्ये एकूण हरकत पैकी तब्बल ४८ मतदान तक्रारदाराच्या तक्रारींचे दखल घेऊन कमी करण्यात आले आहे.

वरील तिघे तक्रारदारानि तक्रारीत असे म्हटले होती की, दि.२७ नोव्हेंबर-१६ रोजी दुधनी नगर परिषदेचे सार्वत्रिक निवडणूक झाली होती. दि.२९ डिसेंबर-१८ रोजी प्रभाग २ चे पोटनिवडणुक झाली होती. तसेच दि.२६ फेब्रुवारी-१८ रोजी प्रभाग-४ चे पोटनिवडणुक झाले होते. तेव्हा तक्रारींत नमूद केलेले मतदारांनी वरील वेगवेगळ्या ठिकाणी मतदान केलेले असून आता प्रभाग-१ मध्ये कसे काय यादीत नावे आले, असे नमूद करून १३० मतदारांच्या नावावर हरकती घेतले होते. त्याचे पुरावे सोबत जोडले होते. त्याबाबत सुनावणी दि.२४ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता झाली. त्यामध्ये ४८ नावे कमी करण्यात आले आहे. यामुळे वातावरण निवाळण्यास मदत झाली आहे.

सुनावणी वेळी प्रशासनाचे मुख्याधिकारी आतिष वाळुंजे, कार्यालयीन अधीक्षक चिदानंद कोळी, बीएलओ रामचंद्र हत्ते, कर विभाग प्रमुख चनमल्लप्पा पाटील तसेच नगरसेवक महेश पाटील, व बसवराज हौदे, बाबा टक्कळकी, हणमंत कलशेट्टी, गुरुषांत कोळी, गुरुषांत बुळगोंडा आदीजण उपस्थित होते. This

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!