भोसले पिता-पुत्र धार्मिक क्षेत्रातील कार्य सम्राट ; उज्जेन जगद्गुरू सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामी !
अक्कलकोट : प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळाकडून सुरु असलेले सेवा कार्य उल्लेखनीय असुन, भोसले पिता-पुत्र धार्मिक क्षेत्रातील कार्य सम्राट असल्याचे गौरव उदगार उज्जेन जगद्गुरू सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामी, श्रीशैल जगद्गुरू डॉ. पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी व काशी जगद्गुरू डॉ मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी या तीन ही पिठाच्या जगद्गुरूनी काढले.
सोलापूर येथील भवानी पेठे येथे डॉ. शैलेश पाटील यांच्या कार्यक्रमात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांचा देखील सत्कार तीन ही पिठाच्या जगद्गुरूंच्या हस्ते करून आशीर्वचन केले. या प्रसंगी तीन ही पिठाच्या जगद्गुरूनी गौरव उदगार काढले.
या प्रसंगी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी सोलापूरचे सुपुत्र डॉ. शैलेश पाटील यांची उज्जेन, श्रीशैलम आणि काशी पीठ समितीचे ट्रस्टी म्हणून यांची निवड झाल्याबद्दल कौतुक व शुभेच्छा व्यक्त करून हा सोलापूरचा बहुमान आहे, असे यावेळी भोसले हे म्हणाले. व डॉ. श्रीशैल पाटील यांना वाढदिवसाबद्दल अभीष्टचिंतन व्यक्त केले.
या कार्यक्रमास डाॅ.शरणबसपपा दामा,डाॅ.राजेंद्र घुले,नितीन हबीब,रविकांत पाटील, चप्पळगावकर,न्यासाचे सचिव शामराव मोरे, रोहित खोबरे, सौरभ मोरे,अमित थोरात, बाळासाहेब कुलकर्णी -देसाई, अश्पाक काझी, स्वामिनाथ गुरव, पिट्टू साठे, महांतेश स्वामी, समर्थ सोमवंशी यांच्या सह आदिजन बहुसंखेने उपस्थित होते.