नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरात गेल्या काही महिन्यापासून सोन्यासह चांदीच्या दरात घसरण होत असतांना आता पुन्हा एकदा सोने-चांदीच्या किंमती विक्रमी दिशेने धाव घेत आहे. गेल्या दहा दिवसांत एकदा किंमतीत घसरण नोंदविण्यात आलेली नाही. भाव एक तर स्थिर आहेत. अथवा भावात वाढ झालेली आहे. गेल्या आठवड्यात मौल्यवान धातूंनी दमदार आघाडी उघडली होती. दोन आठवड्यांपूर्वी सोने-चांदीत सलग तीन दिवस घसरण झाली होती. गेल्या 15 दिवसांपासून किंमतीत घसरण नाही. भाव एकतर स्थिर आहेत. अथवा भावांनी चढाई केली आहे. किंमती आता यापूर्वीच्या विक्रमाला गवसणी घालण्याच्या तयारीत आहेत. सोने आणि चांदीने यावर्षातील उच्चांकी झेप घेतली आहे. सोने 65,000 रुपयांचा तर चांदीने 78,000 रुपयांचा टप्पा ओलांडला.
दोन आठवड्यांचा विचार करता सोन्याने 2300 रुपयांची झेप घेतली. गेल्या आठवड्यात 880 रुपयांनी तर त्यापूर्वी 1100 रुपयांनी किंमती वधारल्या होत्या. या आठवड्याच्या सुरुवातीला किंमती स्थिर होत्या. 26 डिसेंबर रोजी भाव 200 रुपयांनी तर 27 डिसेंबर रोजी 100 रुपयांची दरवाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,960 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
गेल्या दोन आठवड्याचा विचार करता चांदीत 5800 रुपयांची दरवाढ झाली. तर या आठवड्यात किंमतीत 500 रुपयांची वाढ झाली आणि 300 रुपयांची घसरण झाली. या आठवड्यात 25 डिसेंबर रोजी चांदीत 200 तर 26 डिसेंबर रोजी 300 रुपयांची दरवाढ झाली. तर 27 डिसेंबर रोजी 300 रुपयांची घसरण झाली. चांदीत या 15 दिवसांत एकूण 6300 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 79,200 रुपये आहे.