ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दिवाळीनंतर सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ !

मुंबई : वृत्तसंस्था

देशभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असतांना अनेकानी सोन्यासह चांदीच्या दागिन्याची खरेदी केली कारण यंदाच्या दिवाळीत सोन्यासह चांदीचे दागिण्याच्या किमतीत मोठी घसरण झाली होती पण आता दिवाळीनंतर मात्र याच दरात मोठी वाढ झाली आहे.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार नुसार, बुधवारी सोन्याच्या किंमतीत 366 रुपयांची वाढ झाली होती. गुरुवारी 61,616 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव होता. या वर्षी 4 मे 2023 रोजी सोने 61,646 रुपयांच्या विक्रमीस्तरावर पोहचले होते. त्यामुळे हा रेकॉर्ड मोडायला सोन्याला आता अधिक वेळ लागणार नाही. सोन्याला हा रेकॉर्ड मोडण्यासाठी केवळ 30 रुपयांची आवश्यकता होती. चांदी पण लवकरच त्याचा यापूर्वीचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. दिवाळीपासून सोने-चांदीने मोठी भरारी घेतली. गेल्या आठवड्यात सोन्यात 1500 रुपयांची वाढ झाली. तर चांदी 4600 रुपयांची आगेकूच केली. ग्राहकांच्या खरेदीच्या उत्साहावर पाणी फेरले गेले.

गेल्या 10 दिवसांत सोन्याच्या किंमतीत 1500 रुपयांची वाढ झाली. या आठवड्यात 20 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या भावात 50 रुपयांची घसरण झाली. 21 नोव्हेंबर रोजी भाव 380 रुपयांनी वाढले. 22 नोव्हेंबर रोजी भावात बदल झाला नाही. 23 नोव्हेंबर रोजी 50 रुपयांनी भाव घसरला. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 56,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,120 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

13 नोव्हेंबरपासून आजपर्यंत चांदीने 4600 रुपयांची भरारी घेतली. या आठवड्याच्या सुरुवातीला दरवाढीला ब्रेक लागला. पण 21 नोव्हेंबर रोजी किंमती 400 रुपयांनी वाढल्या. 22 नोव्हेंबर रोजी किंमतीत 400 रुपयांची घसरण झाली. 23 नोव्हेंबर रोजी 200 रुपयांची भाव वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,200 रुपये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!