छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून छत्रपती संभाजीनगरमधील दरोडा प्रकरण मोठ्या चर्चेत आले होते आता छत्रपती संभाजीनगर मधील वाळूज परिसरातील राहणारे उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा प्रकरणी मुख्य आरोपी असलेला अमोल खोतकर याचा पोलिसांच्या एनकाऊंटर मध्ये मृत्यू झाला आहे. वडगाव कोल्हाटी परिसरामध्ये रात्री ही चकमक झाली. यामुळे आता या प्रकरणातील सस्पेन्स आणखीनच वाढले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात राहणारे उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा पडला होता. त्यानंतर पोलिस दरोडेखोरांच्या मागावर होते. यातील मुख्य आरोपी अमोल खोतकरला पकडण्यासाठी गेल्यावर त्याने पोलिसांच्या अंगावर गाडी घालून पोलिसांनाच मारण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अमोलचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून देखील अधिक माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचे सांगितले जात आहे.
छत्रपती संभाजीनगर मधील बजाज नगर परिसरात राहणारे उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यावर दरोडा पडला होता. यात सहा कोटी रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केला होता. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने पाच जणांना ताब्यात घेतले होते. मात्र, गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार अद्यापही फार होता. त्यालाच ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी प्रचंड गुप्तता पाळत कारवाई सुरू केली होती. यातील मुख्य आरोपी असलेला अमोल खोतकर हा काल रात्री पोलिसांना सापडला. मात्र त्याने पोलिसांच्या अंगावर गाडी घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांच्या दिशेने गोळी चालवली. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबार त्याचा मृत्यू झाला.