छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील वाहनधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ (एचएसआरपी) बसवण्यासाठी आतापर्यंत ८ लाख वाहनांपैकी ३ लाख ५४ हजार ७०१ वाहनधारकांनी प्लेटसाठी ऑनलाइन बुकिंग केली आहे. त्यातील २लाख ९८ हजार ६४१ वाहनधारकांनी नंबर प्लेट बसवली आहे. बुकिंग केलेल्यापैकी ५६ हजार वाहनधारकांनाप्लेट बसवण्याचे काम सुरू आहे. नंबर प्लेट बसवण्याची मुदत ३० नोव्हेंबर रोजी संपणार आहे. अद्याप ५ लाख वाहनांना नंबर प्लेट बसवण्याचे आव्हान आहे.
देशभरात एकाच स्वरूपाच्या वाहनांना नंबर प्लेट असाव्यात, यासाठी हा निर्णय घेतला आहे. सर्वप्रकारच्या वाहनांना नवीन सुधारित, अद्ययावत नेमप्लेट बसवावी लागणार आहे. त्यासाठी आरटीओ कार्यालयाने एजन्सी नेमली आहे. हाय सेक्युरिटी नंबर प्लेटबसवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यासाठी ३१ मार्च २०२५ही मुदत दिली होती. मात्र, त्याला वाहनधारकांचा अल्प प्रतिसाद असल्याने ३ वेळा मुदतवाढ दिली आहे.
यापूर्वी ३ वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही नंबर प्लेट बदलणे बाकी असलेल्या वाहनांची संख्या मोठी आहे. या सर्व वाहनांवर कारवाई करणे शक्य नाही. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे नव्या नंबर प्लेट लावण्यासाठी सरकार पुन्हा एकदा मुदतवाढ देऊ शकते. सध्या यासंदर्भात सरकारकडून काही स्पष्ट केलेले नसले, तरी लवकरच प्रशासनाकडून दिशानिर्देश जारीकेले जातील, असे मानले जाते.
तीन वेळा मुदतवाढ
पहिल्यांदा : ३० एप्रिल २०२५
दुसऱ्यांदा : १५ ऑगस्ट २०२५
तिसऱ्यांदा : ३० नोव्हेंबर २०२५