पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरु असून नुकतेच पुणे जिल्ह्यातील पौड जवळ असलेल्या घोटावडे या ठिकाणी हेलिकॉप्टर कोसळण्याची माहिती समोर आली आहे. खराब हवामान आणि पाऊस यामुळे हेलिकॉप्टर कोसळले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, काही तांत्रिक बिघाडामुळे हे हेलिकॉप्टर कोसळले असल्याची माहिती समोर आली आहे. या हेलिकॉप्टरमध्ये पायलट सोबतच तीन प्रवासी प्रवास करत होते. हे सर्व जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत कोणाचाही मृत्यू झाला नसल्याचा माहिती देखील समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमधील ग्लोबल या कंपनीचे हे हेलिकॉप्टर आहे. यामध्ये पायलटसह तीन प्रवासी देखील प्रवास करत होते. मात्र, अचाकन ते पुण्यातील पौड जवळ असलेल्या घोटावडे या भागात कोसळले. या घटनेचा एक व्हिडीओ देखील प्रचंड व्हायरल झाला आहे. या परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमींची मदत केल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे.
मुंबईतील ग्लोबल कंपनीचे AW 139 या हेलिकॉप्टर असल्याची माहिती मिळाली आहे. तर या अपघातामध्ये कॅप्टन आनंद यांच्यासह हेलिकॉप्टरमध्ये असलेले धीर भाटिया, अमरदीप सिंग, एसपी राम यांचा हे जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात हवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार देखील सुरू झाले असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.