मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकीची माघारीचा दिवस उगविला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मागच्या अनेक दिवसांपासून उमेदवारांच्या निवडीसाठी खल सुरु होता. पण आता मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.
काल दिवसभर मतदारसंघानुसार सगळ्यांसोबत सविस्तर चर्चा झाली. मतदारसंघ सुद्धा ठरले, काही कमी तर काही वाढले असतील. मराठा समाजाने मतदानावर लढायचं आहे. आमच्या मित्र पक्षाची आणखी यादी आली नाही. लढायचं जमेल का? यादीच नाही म्हणल्यावर… एका जातीवर कस निवडून यायचं, त्यामुळे नाईलाज आहे एकटयाने कसं लढायचं. यावर रात्री आमची चर्चा झाली. यादी न आल्यामुळे नाईलाजाने एका जातीवर जिंकणे शक्य नाही त्यामुळे थांबून घेतलेलं बरं राहीन, असं जरांगे म्हणालेत.
एका जातीवर निवडणूक लढवून जातीचं हसू करून घेऊ का? राजकारण हा आमचा कुठं खानदाणी धंदा आहे… माघार घेणारी औलाद नाही आमची… एका जातीवर निवडून येत नाही, म्हणून उमेदवार देणार नाही. हा गनिमी कावा आहे. मी कालपासून सांगतोय, तिघांचं समीकरण आहे, पण यादीच आली नाही, समाजाला एक सांगणं आहे,तुमच्या मतदारसंघातल्या एकाला मदत करायचं तर करा पण त्याच्याकडून लिहून घ्या, असं जरांगे म्हणालेत.