ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोठी बातमी : राज ठाकरे ‘मातोश्री’वर दाखल; उद्धव ठाकरेंची गळाभेट घेत दिल्या शुभेच्छा !

मुंबई : वृत्तसंस्था

 राज्यात ठाकरे बंधू एकत्र एकाच व्यासपीठावर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती आता मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज पुन्हा एकदा भेट झाली आहे. अर्थात यामागे कारणही खास आहे. आज उद्धव ठाकरेंचा ६५ वाढदिवस आहे. यासाठी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले आहेत.

राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे मातोश्रीवर पोहोचले असून संजय राऊत, अंबादास दानवे यांनी त्यांचे स्वागत केले आहे. राज ठाकरे येताच उद्धव ठाकरे यांनी त्यांची गळाभेट घेतली. हे दृश्य पाहून कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. मराठीच्या प्रश्नावरुन झालेल्या मनोमिलनानंतर ठाकरे बंधुंच्या या नव्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणात हिंदी सक्तीचा प्रस्ताव आल्यानंतर महाराष्ट्रात मोठा विरोध झाला होता. त्यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेच्या संरक्षणासाठी एकत्रितपणे आवाज उठवला. या मुद्द्यावर त्यांनी संयुक्तपणे मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. परंतु सरकारने हा निर्णय मागे घेतल्यानंतर 5 जुलै 2025 रोजी  विजयी एकत्र मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात दोघेही तब्बल २० वर्षानंतर एकाच व्यासपीठावर आले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!