पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी मोठ्या गुन्हेगारी घटना घडत असतांना पुणे शहरात आज दि.२ मार्च रोजी पुन्हा मोठ्या प्रमाणावर ड्रग्स जप्त करण्यात आलेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. विश्रांतवाडी भागातून ८० किलोहून अधिक एमडीड्रग्स जप्त करण्यात आलेत.
८० किलो पेक्षा आधिक ड्रग्सची किंमत जवळपास १५० कोटी रुपयांच्या घरात आहे. पुणे ड्रग्स रॅकेट प्रकरणी पोलिसांचा तपास सुरूच आहे. अशात आता पोलिसांनी आज पुन्हा एकदा मोठी छापेमारी केली आहे. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये उडता पंजाबप्रमाणे चित्र निर्माण झालं आहे. वारंवार ड्रग्सचं मोठं रॅकेट समोर येत असल्याने पुणे शहराला उडता पुणे म्हणण्याची वेळ आली आहे.