अमेरिकेचा विकास झाला म्हणून तिथे रस्ते चांगले आहेत असे नाही तर रस्ते चांगले होते म्हणून अमेरिकेचा विकास झाला हे अब्राहम लिंकनचे वाक्य आपल्या मनात पुर्णपणे ठसवून महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री झाल्यानंतर झपाटल्यागत रस्ता बांधणी व विकासकामांचा धडाका अव्याहतपणे चालू ठेवणारे नितिनजी गडकरी!
काळाची गरज ओळखून मुंबई पुणे एक्प्रेस हाय वे नितिनजींच्या दूरदृष्टीची व कार्यकुशलतेची साक्ष देतो. त्यांच्याच काळात वांद्रे वरळी सागरी सेतूचे काम सुरू केले परंतू त्यांच्या कार्यकाळात ते पुर्ण होवू शकले नाही. त्यांच्या कामाच्या अनुभवाचा राष्ट्रीय पातळीवर देखील विचार केला गेला. केन्द्रात मंत्री झाल्यानंतर तर त्यांचा कामाचा झंझावात प्रचंड वाढला आहे. आज देशभर रस्ते बांधणीचे काम अव्याहत सुरू आहे.
सागरी मार्ग वाहतूकीच्या विकासासाठी नितिनजींनी कसोशीने प्रयत्न केलेत. बंदरांचा विकास, जहाज उद्योगाचा विकास, देशांतर्गत नदी जहाज वाहतूक उद्योगाचा विकास या सर्वात नितिनजींचे कार्य अविश्रांत सुरू आहेत.
गंगा सफाईचे काम नितिनजींनी स्विकारले व जरी पुर्णतः सफाई झाली नसली तरी पुर्वी जी घाण नदीत होती ती जवळपास नाहीच. इच्छाशक्ती असली की कोणतीही गोष्ट असंभव नाही हेच नितिनजींनी कृतीतून दाखवून दिला आहे.
ज्यांनी विकासाच्या गंगेला अविरत प्रवाहीत केले, भारत मातेच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास हेच ज्यांचे जीवनकार्य आहे, केवळ पोकळ आश्वासन न देता ” बोले तैसा चाले ” या उक्तीनुसार चालणा-या, किंवा उक्ती व कृतीत अत्यल्प देखील फरक नसलेल्या नितिनजींना प्रचंड बहुमताने विजयी करून देशाच्या विकास कार्यात व भारत मातेला परम वैभव प्राप्त करण्याच्या कार्यात आपले योगदान असावे हा संकल्प प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. अशा या महान नेतृत्व वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !