ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साधेपणाने साजरी

अक्कलकोट :- पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 296 व्या जयंतीनिमित्त अक्कलकोट बस स्थानक आगारामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुनिल बंडगर यांनी स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनाठायी खर्च न करता बहुजन समाजातील लोकांना समान न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची प्रतीमा बसवून ठेवले आहे. त्या ठिकाणी आज अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त आज दुपारी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त प्रमुख कार्यकारी सदस्य अमोलराजे भोसले यांच्या शुभहस्ते तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष तथा ग्रामीण रुग्णालय सल्लागार समिती सदस्य अविनाश मडीखांबे यांच्या अध्यक्षतेखाली पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी अक्कलकोट नगरपरिषदेचे नगरसेविका सारीका सुभाष पुजारी, स्वीकृत नगरसेवक कांतू धनशेट्टी, धनगर समाज अक्कलकोट तालुका कोषाध्यक्ष शंकर व्हनमाने, शुभाष पुजारी, वसंत बंडगा, राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दत्ता माडकर, शहर अध्यक्ष स्वामीराव घोडके, सुरेश गायकवाड, घोडके मॅडम, सुर्यकांत बाचके, आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना रिपाईचे तालुका अध्यक्ष तथा ग्रामीण रुग्णालय सल्लागार समिती सदस्य अविनाश मडिखांबे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी फक्त धनगर समाजासाठी काम न करता हिंदु, मुस्लिम, ख्रिश्चन, आदी समाज बांधवांसाठी समाज उपयोगी काम केले आहे. त्यांनी सलग अठ्ठावीस वर्षे राज्य कारभार करुन महिला ही पुरुषापेक्षा कमी नाही हे सिद्ध करुन दाखवले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी बालविवाह व सती कायदा तसेत सात बारा उतारा आदी काढण्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या उत्तम प्रशासकीय राज्यकर्त्या होत्या अशा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचाराचे आचरण आपण जीवनात केल्यास आपणांस कोणत्याही प्रकारची कमी पडणार नसल्याचे हमी अविनाश मडिखांबे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर व्हनमाने यांनी केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दत्ता माडकर यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!