ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाजप आ.शिवाजी कर्डिलेंचे निधन

अहिल्यानगर : वृत्तसंस्था

राज्याच्या राजकारणातून एक दुखद बातमी समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजी भानुदास कर्डिले (वय 66) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज पहाटेच्या सुमारास त्यांना त्रास जाणवू लागल्यामुळे तातडीने अहिल्यानगर येथील साईदीप साह्यद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाने राहुरी मतदारसंघासह अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, सर्वत्र शोककळा पसरली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे होते.

कर्डिले यांनी बोऱ्हानगर येथे दुधाचा व्यवसाय सुरू करून सरपंच पदापासून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी बांधकाम आणि हॉटेल उद्योगाच्या माध्यमातून मोठी व्यावसायिक पकड मिळवली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील ते सक्रीय होते. 2009 ला त्यांनी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढली. त्यामध्ये त्यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर पुन्हा 2014 ला राहुरी मतदारसंघातून विजय मिळवला होता. 2009 ते 2014 असे सलग दहा वर्ष त्यांनी राहुरीचे विधानसभेत नेतृत्व केले. 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी कर्डिलेंचा पराभव करत त्यांनी विजयाच्या हॅट्रीकपासून रोखले होते. मात्र, 2024 च्या निवडणुकीत या पराभवाची परत फेड करत कर्डिले यांनी प्राजक्त तनपुरेंना पराभूत केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!