मुंबई : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 6 जिल्ह्यातील पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीला राज्यातील क्रमांक 1 चा पक्ष म्हणून विजयी केल्याबद्दल सर्व मतदारांचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मन:पूर्वक आभार मानले आहेत. पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे सुद्धा त्यांनी अभिनंदन केले आहे.
या निकालाच्या तपशीलात गेले तर जिल्हा परिषद, पंचायत समिती मिळून 25 टक्के जागा भाजपाला तर 25 टक्के जागा अपक्ष आणि छोट्या पक्षांना मिळाल्या आहेत. उरलेल्या 50 टक्क्यात महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष सामावले आहेत. शिवसेनेच्या बळावर कोण मोठे होते आहे आणि शिवसेना कशी अधिकाधिक रसातळाला जात आहे, हेच या निवडणुकीतून दिसून येते आहे. भाजपाचा जनाधार सातत्याने वाढतो आहे आणि इतरांचा जनाधार कमी होतो आहे. शिवसेना तर आणखी खाली जाते आहे. कोण रसातळाला जात आहे, हे या निवडणुकीने स्पष्ट झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भाजपावरच मतदारांनी विश्वास दाखविला आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. एका कार्यक्रमासाठी उत्तन येथे गेले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
लखिमपूरप्रकरणी उत्तरप्रदेश सरकार कारवाई करेलच. पण, महाराष्ट्रातील शेतकर्यांकडे महाविकास आघाडी सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. अतिवृष्टी, पुराने नुकसान झालेल्या राज्यातील आक्रोशित शेतकर्यांचा अधिक विचार राज्य सरकारने केला असता, तर त्यांना दिलासा मिळाला असता. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, शेतकर्यांप्रती नक्राश्रू ढाळू नका. कुठल्याही दुर्दैवी घटनेपेक्षा त्यावरील राजकारण हे अधिक दुर्दैवी असते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्यातील मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांबाबत पत्रकारांनी विचारले असता, ते म्हणाले की, एनसीबीचे नाव काढले की नवाब मलिकांच्या पोटात का दुखते? त्यांचे