ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाजप आमदार आशिष शेलारांसह 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन,आमदार राम सातपुते यांचा समावेश

 

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याचं बघायला मिळालं. यावेळी धक्काबुक्की करणारे भाजपचे आमदार आशिष शेलार, अतुल भातखळकर, राम सातपुते, अभिमन्यू पवार यांच्यासह इतर सात भाजपच्या आमदारांचं एक वर्षासाठी करण्यात आले आहे. त्यामुळे विरोधकांना ही धक्काबुक्की भोवल्याचे दिसून येत आहे.निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या 12 आमदारांची नावे अशी आहेत.आशिष शेलार, अतुल भातखळकर, राम सातपुते, अभिमन्यू पवार, संजय कुटे, गिरीष महाजन, जयकुमार रावत, नारायण कुचे, पराग अळवणी, शिरीष पिंपळे, योगेश सागर, किर्तीकुमार बागडीया यांचा समावेश आहेेेेे.या करावाईनंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या सर्व आमदारांनी कामकाजावर बहिष्कार घालून बाहेर पडले आहेत.

ओबीसींचं आरक्षण रद्द झाल्यानंतर इंपेरिकल डाटा केंद्र सरकारने राज्य सरकारला उपलब्ध करून द्यावा, असा ठराव ठाकरे सरकारने विधानसभेत मांडला आहे. याविरोधात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनात येऊन जोरदार घोषणाबाजी केली. तसेच अध्यक्षांचा माईकही ओढला. यावेळी सभागृहात धक्काबुक्कीचा प्रकार घडल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!