ध्यास विश्वसार्ह बातमीचा

२०२९ साठी भाजपकडून वातावरण निर्मिती ; रोहित पवारांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात नागपूर शहरात झालेल्या दंगलीवर आता मोठे राजकारण तापले असतांना आता महाविकास आघाडीमधील शरद पवार गटाचे नेते रोहित पवारांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 2029 मध्ये देशात भाजपचे सरकार यावे म्हणून आतापासून राज्यात वातावरण निर्मिती केली जात आहे. भाजपचा विचार करम वातावरण गरम केले जात आहे, लोकांचा विचार केला जात नाही, असा आरोप नागपूर दंगल आणि औरंगजेबाच्या कबरीवरुन पेटलेल्या वातावरणावरुन रोहित पवार यांनी केला आहे.

रोहित पवार म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आरोप अगदी खरा आहे. या पुढील निवडणूक औरंगजेबाच्या मुद्यावर भाजपकडून लढवली जाईल. महिला पोलिसांचा विनयभंग झाला असेल हा पूर्वनियोजित कट असेल तर तुम्ही झोपला होतात का? तुम्हाला माहिती असून शांत बसला का? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे. प्रशांत कोरटकरच्या बाबतील आम्ही पहिल्यापासून सांगत आहोत की जेलमध्ये टाकले पाहिजे. पण सरकारकडून त्यांना सहकार्य सुरू आहे, असा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. ते मुंबईत फिरत होते हे सर्वांना माहिती होते. पण त्याला पकडण्याची इच्छाशक्ती ह्या सरकारकडे नाही.

रोहित पवार म्हणाले की, कोरटकर, सोलापूरकर हे भाजपच्या काही नेत्यांचे खास माणसं आहेत. म्हणून कुठतंरी त्यांना पाठिंबा दिला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांचा कितीही अपमान ह्या दोन टुकार लोकांनी केला तरी यांना सरकारमधील लोकं पाठबळ देतात असे म्हणावे लागेल.

रोहित पवार म्हणाले की, सरकारमधील नेते बोलताना म्हणतात की सर्वांनी शांतता ठेवली पाहिजे. पण दुसऱ्या बाजूला त्यांचे खास मंत्री अतिशय आक्रमक, वातावरण बिघडेल अशी वक्तव्य करतात. हे छोटे नेते जे वातावरण गरम करत आहेत ते बाहुली आहेत. त्यांच्याकडून बोलून घेणारे दुसरे कोणीतरी आहे.रोहित पवार म्हणाले की, राज्यात बेरोजगारी वाढली आहे. शेतकरी-कष्टकरी अडचणीत आहेत. युवकांच्या हाताला काम आणि पोटाला अन्न नाही. तरुणांपासून शेतकऱ्यांपर्यत वाढणाऱ्या आत्महत्या याकडे लोकांचे लक्ष जाऊ नये म्हणून औरंगजेबाचा मुद्दा सत्ताधाऱ्यांकडून पुढे आणला जात आहे.

रोहित पवार म्हणाले की, आम्ही मांडलेल्या सामान्य लोकांच्या मागण्या जर हे सरकार पूर्ण करणार असेल तर कुठलीही कबर काढण्यासाठी आम्हीही पाठिंबा देऊ. पण सामान्य लोकांचे विषय सुटत असतील तर. पण तुमच्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत म्हणून लक्ष विचलित करण्यासाठी जर तुम्ही असे करत असताल तर हे चुकीचे आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!
Join WhatsApp Group