ध्यास विश्वसार्ह बातमीचा

संजय राऊतांच्या “त्या” वक्तव्याला भाजपचे जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : राम जन्मभूमी मंदिराची उभारणी हा भागव्यवर निष्ठा असणाऱ्या पक्षांसाठी विश्वासाचा आस्थेचा प्रश्न आहे. त्यामुळे रामजन्मभूमी जागा खरेदी करण्यात काही गैर व्यवहार झाला असेल तर त्याचे स्पष्टीकरण राम जन्मभूमी न्यास आणि इतर नेत्यांनी दिली पाहिजे अशी मागणी शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी सामनामधून केली आहे.

जर राममंदिर न्यासावर गैरव्यवहाराचे आरोप होत असतील तर त्यांनी त्याची उत्तर दिली पाहिजे. या भूमिपूजन समारंभात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. त्यांनी या विषयावर बोलले पाहिजे जर विश्वासाने गोळा केलेले पैशाची गैरवापर होत असेल तर त्या विश्वासाला काय किंमत? हे सर्व खरे आहेत की खोटे याची उत्तर आम्हाला मिळाली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे असे सल्ला संजय राऊत यांनी दैनिक सामनामधून दिला होता.

संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे की, “लोकांनी श्रद्धा आणि विश्वासाने राम मंदिरासाठी देणग्या दिल्या आहेत, त्याचा व्यवस्थित हिशोबही ठेवला जातो. शिवसेनेला विश्वास नसेल तर त्यांनी दिलेले एक कोटी परत मागावे. त्यातून एखादी टिपूची मजार बांधावी. शिवसेनेच्या जीवावर मंदिर निर्माण सुरू नाही.” शिवसेनेनं आता हजरत टिपूचा विचार करावा, राम मंदिराचा विचार करण्यासाठी संघ परिवार आणि हिंदू समाज सक्षम आहे,’ असं भातखळकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!