सोलापूर : प्रतिनिधी
आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राच्या ३९ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन सकाळी नऊ ते एक या वेळेत केले होते. त्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता रमा कुलकर्णी आणि वैष्णवी चव्हाण, सृष्टी म्हेत्रे, मनस्वी सुर्डीकर या विद्यार्थ्यांसोबत सुगम संगीताचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध झाले.
याप्रसंगी कार्यक्रम विभागप्रमुख श्रीनिवास जरंडीकर,सहाय्यक केंद्र निर्देशक (अभियांत्रिकी) अर्चिता ढेरे, सहाय्यक अभियंता सुनील परळीकर, अभियंता दिलीप मिसाळ, प्रसारण अधिकारी सुजित बनसोडे, डॉ. सोमेश्वर पाटील, बाळासाहेब मस्के आदी उपस्थित होते. सकाळच्या सत्रात दमाणी ब्लड बँकेच्या वतीने रक्त संकलन झाले. यामध्ये अनेकांनी रक्तदान केले. संध्याकाळच्या सत्रात सप्तसुरांचे देणे या संगीत मैफिलीचा कार्य्रक्रम झाला. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले दीपप्रज्वलन झाले.त्यानंतर बहारदार गाण्यांचा कार्यक्रम संपन्न झाला. संगीत मैफिलीनंतर संस्कृती शहा यांनी भरतनाट्यम आणि तेजश्री कुमठेकर यांनी तबलावादन करून उपस्थित रसिकांची मने जिंकली. साथसंगत तबला – भरतेस तडवळकर, ढोलकी -किरण भोसले, सिन्थेसायझर – आमिर हुंडेकर,तालवाद्ये – रहमान शेख यांनी केली. त्यानंतर कार्यक्रम विभाग प्रमुख श्रीनिवास जरंडीकर,प्रसारण अधिकारी सुजित बनसोडे,डॉ.सोमेश्वर पाटील,सुनील परळीकर यांनी आकाशवाणीच्या एकंदर वाटचालीचा
आढावा घेतला तर जेष्ठ पत्रकार प्रशांत जोशी,अश्विनी मोरे, नितीन बनसोडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी आकाशवाणीच्या महसुलात योगदान देणाऱ्यां जाहिरात एजन्सीच्या प्रतिनिधींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
रेडिओ फीचर, डॉक्युमेंटरी, नभोनाट्य, काव्यवाचन, अभिवाचन, रेडिओ जिंगल्स, पब्लिक अनाउन्समेंट अशा स्पर्धा कार्यक्रम विभागाच्या वतीने घेण्यात आल्या होत्या.
त्याचे बक्षीस वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. त्याचा निकाल – १. रेडियो फीचर – प्रथम – कृपाली कुलकर्णी,२. रेडियो ड्रामा – प्रथम – बळवंत जोशी,३. म्युझिकल प्रोग्राम- प्रथम – राजेंद्रकुमार कांबळे ४. रेडियो जिंगल – प्रथम – अश्विनी वाघमोडे ५. पब्लिक अनाउन्समेंट- प्रथम – कृपाली कुलकर्णी .६ गद्य वाचन – प्रथम – अश्विनी वाघमोडे, द्वितीय – विद्या जोशी -वालवडकर, तृतीय – मृणाल निपुणगे ,लक्षवेधी- यश गोसावी. ७. पद्य वाचन प्रथम – तेजश्री कुमठेकर, द्वितीय –
षाहझोया सुभेदार, तृतीय – नितीन बनसोडे ,लक्षवेधी- साक्षी हौदे.. सूत्रसंचालन बळवंत जोशी आणि ऐश्वर्या हिबारे यांनी तर शेवटी प्रा वैभव कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार यांनी मानले. याप्रसंगी सोलापूर दिनांकच्या पत्रकार टीमने अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला आकाशवाणीतील अधिकारी,कर्मचारी, निवेदक आणि सोलापूर दिनांकचे पत्रकार उपस्थित होते.