अक्कलकोट, दि.४ : राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोव्हिड-१९
च्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने अक्कलकोट तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिलीपभाऊ सिध्दे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
६ जून रोजी अक्कलकोट शहरातील टिनवाला मंगल कार्यालय वागदरी रोड
येथे सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत हे शिबिर पार पडेल.दरवर्षी दिलीपभाऊ सिद्धे मित्र परिवाराकडून हा उपक्रम आयोजित केला जातो.यावर्षी देखील कोरोनाचे सर्व नियम पाळून हे शिबीर आयोजित केले असुन सर्वांनी रक्तदान करुन सहकार्य करावे,असे आवाहन सामाजिक
कार्यकर्ते अविराज सिध्दे, मुन्ना राठोड,
बंटी पाटील यांनी केले आहे.
अधिक माहिती साठी 9028434747,
9175202424,9970245079 संपर्क करावे.