---Advertisement---

अक्कलकोटची चौडेश्वरी देवी यात्रा रद्द

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट,दि.४ – येथील कुंभार गल्लीतील श्री चौडेश्वरी देवी चँरिटेबल ट्रष्ट च्यावतीने सालाबादाप्रमाणे होणारी ग्रामदैवत श्री चौडेश्वरी देवीची यात्रा यंदाच्या वर्षी कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आली आहे.

यंदाची श्री चौडेश्वरी देवीची यात्रा दि. ८ जून चतुर्दशी पासून, दि. ९ जून अमावस्या व दि. १० जून पर्यंत असे तीन दिवस साजरा होणार होती. परंतु  देशभरात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच शासन व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार धार्मीक यात्रेवर बंदी घातले आहे. त्यामुळे या वर्षाची यात्रा रद्द करण्यात आली आहे. तरी सर्व भक्तानी याची नोंद घ्यावी.

यात्रे दिवशी मंदिरा कडे कोणीही येण्याचे प्रयत्न करु नये. सर्व सदभक्तांनी आप-आपल्या घरीच देवीच्या प्रतिमेचे पूजन करावे, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष काशीनाथ कुभांर व सचिव प्रा.सुर्यकांत कडबगावकर यांनी केली आहे.

याञा रद्द करण्यात आल्याचे लेखी निवेदन अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांना देण्यात आले आहे.

या वेळी सहसचिव श्रीशैल कुंभार, खजिनदार शरणप्पा कुंभार , सदस्य शिवानंद कुंभार, शिवशंकर कुंभार , विश्वनाथ कुंभार,सुरेश कुभांर, पुजारी अबंण्णा कुंभार,विरपाक्ष कुंभार चिदानंद कुंभार,मल्लिनाथ कुंभार आदि उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

पुढे वाचा

Leave a Comment

Don`t copy text!