अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
निवडणुकीत बुथवरील कार्यकर्ते हे सक्रिय असले पाहिजेत. यासाठी बुथ कमिट्या सक्षम असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन युवक काँग्रेसचे निरीक्षक शौर्य केसरवाणी (अलाहाबाद) यांनी केले.
अक्कलकोट येथील काॅंग्रेस कमिटी कार्यालय येथे कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी केसरवाणी बोलत होते. लोकसभा निवडणूकीचे लवकरच बिगुल वाजणार आहे. लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदे व त्या नंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांना आपण सर्वांनी विजयी करावयाचे आहे असे ते म्हणाले. नुकत्याच पार पडलेल्या लोणावळा येथील काॅंग्रेसच्या शिबिरात बुथ कमिट्या बाबत मार्गदर्शन करण्यात आले. आत्ता पासुनच कार्यकर्त्यांनी सतर्क राहिले पाहिजे, असे माजी जि.प.सदस्य मल्लिकार्जुन पाटील यांनी सांगितले.यावेळी अक्कलकोट तालुक्यात विधानसभेसाठी चांगली परिस्थिती असून माजी आमदार म्हेत्रे यांना निवडून येण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अरुण जाधव यांनी केले.यावेळी युवक काँग्रेसचे निरीक्षक केसरवाणी यांनी बुथ कमिट्या व सोशल मीडिया बाबत सविस्तर माहिती सांगितली.
याप्रसंगी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष संजय पवार, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाबा पाटील, शहर अध्यक्ष मुबारक कोरबु, शिवराज पुजारी, अय्याज चंदनवाले, शिवानंद बिराजदार, राहुल मोरे, शिवशरण इचगे, सुनिल इसापुरे, यश जाधव, मारूती माळी, आकाश निंगदळे, हणमंत मुलगे, निशांत कवडे, सर्फराज शेख, कोरे,रतन बिराजदार आदी उपस्थित होते. आभार बाबा पाटील यांनी मानले.