प्रियकराने स्वतःला पेटवून घेत प्रेयसीला मारली मिठी, औरंगाबादमधील घटना

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने स्वतःला पेटवून घेत प्रेयसीला मिठी मारल्याची थरारक घटना आज दुपारी २ वाजेच्या दरम्यान पहाडसिंग पुरा परिसरात घडली. या घटनेत दोघे गंभीर रित्या गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचार सुरु आहे.

गजानन मुंडे आणि पूजा साळवे अशी प्रेमीयुगुलाचे नाव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील झुलॉजी विभागात दोघांची ओळख झाली. पूजा साळवेचे येथेच पीएचडी पूर्ण झाली असून ती सध्या फॉरेनसिक सायन्स महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून तासिका तत्वावर कार्यरत आहे. तर गजाजनची पीएचडी सुरु आहे. अनेक दिवसांपासून दोघांत प्रेम संबंध होते. मात्र मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वाद झाला होता. यातूनच ही घटना झाल्याची माहिती आहे.

Leave a Comment