ध्यास विश्वसार्ह बातमीचा

प्रियकराचा थरार : प्रेयसीच्या अडीच वर्षाच्या मुलीवर अत्याचार : मुलीचा मृत्यू !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील मालवण येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने प्रेयसीच्या अडीच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेत मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी हत्येसह लैंगिक अत्याचार आणि पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून आईसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. ही घटना मालवण येथे रविवारी उघडकीस आली आहे. या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० वर्षांची आरोपी महिला मालाडच्या मालवणी परिसरात राहते. तिचे एका १९ वर्षांच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. तीन वर्षांपूर्वी तिचा पती तिला सोडून गेला होता. त्यावेळेस ती गरोदर होती. त्यानंतर तिने एका मुलीला जन्म दिला होता. सध्या ही मुलगी अडीच वर्षाची होती.

रविवारी रात्री आरोपी प्रियकर तिच्या घरी आला होता. यावेळी त्याने महिलेशी शारीरिक संबंध ठेवले होते. त्यानंतर त्याने तिच्या डोळ्यादेखतच अडीच वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यात तिचा मृत्यू झाला होता. या प्रकारानंतर ही महिला मुलीला घेऊन जवळच्या शासकीय रुग्णालयात गेली होती. सुरूवातीला तिने मुलगी आजारी असल्याचे सांगून वैद्यकीय अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, मृत मुलीच्या गुप्तांगावर जखमा दिसून आल्याने डॉक्टरांना संशय आला होता. वैद्यकीय तपासणीनंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर ही माहिती मालवणी पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या आईची चौकशी केल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर या महिलेसह तिच्या १९ वर्षांच्या प्रियकराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!