ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ब्रह्मानंद मोरे प्रतिष्ठानतर्फे सोलापुरात २ एप्रिल रोजी महाआरोग्य शिबिर

पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

लोकनेते स्वर्गीय ब्रम्हानंद मोरे यांच्या २६ व्या पुण्य स्मरणा निमित्त २ एप्रिल रोजी सोलापूरात मोफत महाआरोग्य व भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे आधारस्तंभ प्रमोद मोरे व अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी दिली.

हा उपक्रम काशी पिठाचे जगद्गुरु श्री. श्री. श्री १००८ डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात तर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख,
मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे आणि खानापूरचे आमदार सुहास बाबर,युवा नेते डॉ.किरण देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.यावेळी डॉ.वैंशपायन मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने, डॉ. मनोज कोरे, डॉ. अशोक बोल्डे,डॉ.नम्रता आपटे, डॉ.मुक्तेश्वर शेटे, डॉ.बाबू माने, डॉ. लक्ष्मण अहिरसंग आदींची उपस्थिती राहणार आहे.

या शिबिरात बालरोग,कान, नाक,घसा तपासणी,मोतीबिंदू व नेत्ररोग तपासणी,हाडांच्या सर्व तपासण्या व सांधे प्रत्यारोपण, स्त्रीरोग , किडनी संबधी तपासणी त्वच्या रोग तपासणी,हृदय रोग तपासणी ,मेंदूच्या विविध तपासण्या, प्लास्टिक सर्जरी , दंत रोग तपासणी, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा तपासणी, मधुमेह तपासणी या महाआरोग्य शिबिरात होणार असून या शिबिरात उपचार,औषधे प्रतिष्ठानकडून मोफत देण्यात येणार आहे. या शिबिरात सोलापूर शहरातील तज्ञ डॉक्टर सहभागी होणार आहेत.व्यापक  जनहित लक्षात घेऊन हा उपक्रम सोलापुरातील अक्कलकोट रोडवरील एसव्हीसीएस प्रशालेच्या प्रांगणात सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत पार पडणार आहे.गरजूंनी याचा
लाभ घ्यावा,असे आवाहन प्रतिष्ठानचे आधारस्तंभ प्रमोद मोरे यांनी केले आहे.

या शिबिरात सहभागी होण्यासाठी आधार कार्ड व मोबाईल सोबत आणावा.अधिक माहितीसाठी प्रा. संजय टोंपे -9850342664 प्रकाश शिंदे -8421560489 यांच्याशी संपर्क करावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!