ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ब्रेकिंग…! अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांनी रॅपिड ऍंटीजन टेस्ट अथवा RT-PCR तपासणी केलेले निगेटिव्ह रिपोर्ट असणे बंधनकारक

सोलापूर- सोलापूर शहरांमध्ये वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार कोविड19 साठी देण्यात आलेल्या आदेशानुसार किराणा दुकान, दूध विक्रेते,होम डिलिव्हरी करणारी व्यक्ती अथवा हॉटेल, ई-कॉमर्स तसेच अत्यावश्यक सेवेतील कारखान्यात काम करणारे कामगार या सर्वांना विहित केल्याप्रमाणे रॅपिड ऍंन्टीजेन टेस्ट अथवा RT-PCR तपासणी केलेले निगेटिव्ह रिपोर्ट असणे बंधनकारक आहे.तशी तपासणी मनपा पथकांमार्फत करण्यात येत आहे. मात्र वैधता असलेले रिपोर्ट असल्याचे दिसून येत नाही. तरी दिनांक 23 मे पर्यंत सर्व परवानगी असलेल्या व्यावसायिकांनी तपासणी केलेला रिपोर्ट सोबत बाळगावा.

सर्वच अत्यावश्यक सेवेत व इतर विहित परवानगी असलेल्या दुकानांची तपासणी करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे निगेटिव्ह रिपोर्ट नाही अशांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी माहिती आयुक्त पि .शिवशंकर यांनी दिली आहे. या पुढे सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून कोरोनाची चाचणी ICMR नंबर असलेला कम्प्युटर प्रिंट आपल्याला देण्यात येईल. या संबंधी सर्व नागरी आरोग्य केंद्रांना (UPHC) आदेश देण्यात आले आहेत. ज्यांच्याकडे ICMR नंबर असलेला छापील रिपोर्टच ग्राह्य धरला जाईल. महापालिकेच्या नागरिक आरोग्य केंद्रामध्ये हस्तलिखित देण्यात येणाऱ्या कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट ग्राहय धरला जाणार नाही. याची सर्व अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना नोंद घ्यावी.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!