---Advertisement---

सोलापुरची वैशिष्ट्ये आधुनिक रूपात सादर करा- राहुल सोलापूरकर

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर- सोलापूरचा पर्यटक विकास घडवण्यासाठी सोलापूरची सारी वैशिष्ट्ये आधुनिक रूपामध्ये जगासमोर सादर केली पाहिजेत असे मत नामवंत नाट्य-चित्र कलावंत आणि सोलापूर सोशल फाउंडेशन चे ब्रँड ॲम्बेसिडर राहुल सोलापूरकर यांनी सोमवारी सोलापुरात बोलताना व्यक्त केले. सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोलापूर ब्रँडिंग व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प गुंफताना श्री सोलापूरकर बोलत होते.

सोलापूरच्या इतिहासाच्या पाऊल खुणा आणि सोलापूरच्या भविष्याचा वेध असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.
श्री राहुल सोलापूरकर यांनी सोलापूर मधील वृत्तपत्रांची परंपरा, ऐतिहासिक परंपरा त्याचबरोबर विविध क्षेत्रातील सोलापुर ची वैशिष्ट्ये यांचा आढावा घेतला. सोलापूर मध्ये वैशिष्टे खूप आहेत परंतु ती आधुनिक पद्धतीने पर्यटकांच्या समोर ठेवली पाहिजेत.

सोलापूरच्या विविध हॉटेल आणि लॉज मध्ये किंवा जेवणाच्या निमित्ताने येणाऱ्या प्रत्येक परगावच्या ग्राहकाच्या हातात सोलापूरचा तीन ते चार दिवसांचा पर्यटन कार्यक्रम काय असू शकतो याचे छोटेसे पत्रक दिले पाहिजे तरच त्यांच्या मनामध्ये सोलापूर मध्ये फिरून प्रेक्षणीय स्थळे बघण्याची उत्सुकता निर्माण होईल असे सोलापूरकर यांनी सांगितले. श्री राहुल सोलापूरकर यांनी सामान्य सोलापूरकरांना माहित सुद्धा नसतील अशी सोलापूरची अनेक वैशिष्ट्ये विस्ताराने सांगितली.

सोलापूर रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या रेल्वे गाड्यातील प्रवाशांना सोलापूरचे खास जेवण पुरवण्याची सोय केली तर त्या प्रवाशांबरोबर आणि त्या गाड्या बरोबर सोलापूरची खाद्यसंस्कृती पूर्ण भारतभर पसरेल असे ते म्हणाले. सोलापूरचे ब्रँडिंग होऊ शकते परंतु त्यासाठी कोणीतरी वाहून घ्यावे लागेल असे त्यांनी प्रतिपादन केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!