---Advertisement---

ब्रेकिंग..! अक्कलकोट तालुक्यात शिवसेनेला खिंडार तालुकाध्यक्ष आणि शहर प्रमुखांचा अचानक राजीनामा !

Follow Us:
---Advertisement---

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट दि.२८ : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे अक्कलकोट तालुकाप्रमुख संजय देशमुख व शहरप्रमुख योगेश पवार व अन्य पदाधिका-यानी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे पक्षपदाचा व पक्ष सदसत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे तालुक्यात शिवसेनेला मोठी खिंडार पडली आहे. आता हे पदाधिकारी शिंदे गटात सामील होणार का याची चर्चा सुरू झाली आहे की अन्य पक्षांमध्ये जाणार याविषयी चर्चेला उधाण आले आहे.

अडीच वर्षापासुन कोणतेच काम न झाल्यामुळे पदाधिकाऱ्यामध्ये नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे आम्ही पक्ष पदाचा राजीनामा देत आहोत,असे तालुका प्रमुख संजय देशमुख यांनी सांगितले. शहर प्रमुख व तालुकाप्रमुखांच्या राजीनामामुळे कार्यकर्त्यांमध्येही खळबळ उडाली आहे. राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गटात सुरू असलेल्या संघर्षाची ठिणगी अक्कलकोट तालुक्यात पडली की काय याचीही चर्चा सुरू असून यापुढे शिवसेनेची दिशा काय असणार याबाबतही तालुक्यात उत्सुकता निर्माण झाली आहे. लवकरच अक्कलकोट तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका होणार आहेत.या पार्श्वभूमीवर या राजीनाम्याना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!