ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ब्रेकिंग..! राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर, ”सरपंच” थेट जनतेतून निवडले जाणार..

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यात सत्तासंघर्ष निर्माण झाल्यापासून शिंदे आणि ठाकरे गटात वाद सुरु आहे. याचा परिणाम राज्यातील सरकारसह पालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींबरोबरच ग्राम पंचायतींमध्येही तसेच राजकारण पहायला मिळत आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतींची ही निवडणूक होणार आहे. २८ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरु होणार असून १८ डिसेंबरला मतदान, २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. महत्वाचे म्हणजे ७७५१ ग्रा. पंचायतींचे सरपंच हे थेट जनतेतून निवडले जाणार आहे. काही महिन्यांपूर्वी १ हजार १६५ ग्रा पंचायतींमध्ये निवडणूक झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!