---Advertisement---

ब्रेकिंग..! उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची तोफ अखेर बाहेर, पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना जामीन मंजूर

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. अखेर १०० दिवसांनंतर संजय राऊत यांना जमीन मंजूर झाला आहे. गोरेगावच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने ३१ जुलै रोजी राऊत यांना अटक केली होती. सुरुवातीला पोलिस कोठडी व त्यानंतर दोनदा त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली होती.

गेल्या शंभर’ दिवसांपासून संजय राऊत कोठडीत आहेत. आज त्यांना जामीन मंजूर झाल्याने ठाकरे गटाने जल्लोष केला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची तोफ बाहेर येऊन पुन्हा धडाडणार, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या नेत्यांनी दिली आहे

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!