ब्रेकिंग..! उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची तोफ अखेर बाहेर, पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना जामीन मंजूर
मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. अखेर १०० दिवसांनंतर संजय राऊत यांना जमीन मंजूर झाला आहे. गोरेगावच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने ३१ जुलै रोजी राऊत यांना अटक केली होती. सुरुवातीला पोलिस कोठडी व त्यानंतर दोनदा त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली होती.
BREAKING – Special PMLA Court grants bail to MP #SanjayRaut in the Patra Chawl redevelopment scam being investigated by the #EnforcementDirectorate. #moneylaundering @dir_ed pic.twitter.com/vTPT66dwsB
— Live Law (@LiveLawIndia) November 9, 2022
गेल्या शंभर’ दिवसांपासून संजय राऊत कोठडीत आहेत. आज त्यांना जामीन मंजूर झाल्याने ठाकरे गटाने जल्लोष केला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची तोफ बाहेर येऊन पुन्हा धडाडणार, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या नेत्यांनी दिली आहे