नवी दिल्ली:: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला. जाणून घ्या काय होणार स्वस्त आणि काय होणार महाग या यादीकडे आपण नजर टाकूया.
* काय स्वस्त?
– सोने-चांदी
– भारतीय बनावटीचे मोबाईल
– चप्पल
– नायलॉन – कस्टम ड्युटी कमी करुन 5 टक्क्यांवर
– टेक्सटाईल्स – कपड्याच्या हातमागावर सूट मिळणार
– केमिकल- केमिकलवरील कस्टम ड्युटी कमी करणार
– चामड्याच्या वस्तू, गारमेंट – कस्टम ड्युटी कमी करणार
– स्टील – कस्टम ड्युटी कमी करुन 7.5 टक्क्यांवर
* काय महाग?
– अपारंपरिक ऊर्जा – सोलार पॅनल- इन्व्हर्टर – 5 वरुन 20 टक्क्यांवर
– मोबाईल ऑटो पार्ट – काही गोष्टींवर कस्टम ड्युटी वाढवली
– परदेशी मोबाईल आणि चार्जर
– तांब्याचे सामान
– जेम्स स्टोन – कस्टम ड्युटी वाढवली
– इथाईल अल्कोहोल
-सोने-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी होणार असल्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात कपात होणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या तोंडावर सोने-चांदी खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. याशिवाय भारतीय बनावटीचे मोबाईल स्वस्त होणार आहेत. तर परदेशी बनावटीचे मोबाईल, चार्जर महागणार आहेत. पेट्रोलचे दर वाढणार असल्याने वाहनचालक काहीसे नाराज आहेत.
ज्येष्ठ नागरिकांना दिलासा
2020 मध्ये एकूण 6.48 नागरिकांनी आयकर भरला. 75 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे ज्येष्ठ नागरिक, जे पूर्णतः पेन्शनवर अवलंबून आहेत, त्यांना इन्कम टॅक्समधून दिलासा मिळाला आहे. आता पेन्शन आणि व्याजाच्या माध्यमातून आलेल्या मिळकतीवर ज्येष्ठ नागरिकांना इन्कम टॅक्स रिटर्न भरावाला लागणार नाही आणि कर भरावा लागणार नाही, अशी घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली आहे.