ध्यास विश्वसार्ह बातमीचा

Budget 2021 : शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचं सरकारचं उद्दीष्ट ; गहू उत्पादकांना 75 हजार 60 कोटींची मदत

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन सोमवारी १ फेब्रुवारी २०२१ रोजी संसदेत बजेट सादर करत आहेत. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मोठी घोषणा केली आहे.  शेतकऱ्यांना पिकाच्या उत्पादन खर्चाच्या दिडपट म्हणजेच 1.5 पट किमान आधारभूत किंमत दिली जाणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी केली.

आमचं सरकार शेतकरी हितासाठी वचनबद्ध आहे. शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचं सरकारचं उद्दीष्ट आहे. २०१२ मध्ये शेतकऱ्यांना किमान हमीभावापोटी ३३ हजार कोटी रुपये दिले होते, २०१५ मध्ये शेतकऱ्यांना ५२ हजार कोटी रुपये दिले तर २०२०-२१ मध्ये हा आकडा ७५ हजार कोटी वाढला. गव्हाचं उत्पादन घेणाऱ्या ४३ लाख शेतकऱ्यांना फायदा झालाय अशी माहिती सीतारामन यांनी दिली.

केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर धान्य खरेदी करणार आहे. त्यानुसार २०२०-२१ मध्ये गहू उत्पादकांना ७५ हजार ६० कोटींच्या मदतीकरता तरतूद असल्याची निर्मला सीतारामन यांची माहिती. यावेळी अर्थमंत्र्यांनी २०१३-१४च्या आकड्यांसोबत तुलना केली. दरम्यान, शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्मला सीतारामन यांच्या मोठ्या घोषणा. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांचा उल्लेख करताच विरोधकांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी घोषणाबाजीदेखील करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!