ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कमिशन, विमा, शेअर्स इत्यादींशी संबंधित व्यवसायात फायदा होऊ शकतो.

आजचे राशिभविष्य दि.२८ फेब्रुवारी २०२५

मेष राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुम्हाला भावनिकदृष्ट्या सक्षम वाटेल. आळस सोडून पूर्ण उर्जेने आणि आत्मविश्वासाने तुमचे काम करा. विद्यार्थी आणि तरुणांना स्पर्धेत यश मिळेल.मुलांना त्‍यांच्‍या समस्या सोडवण्यास हातभार लावा. जवळच्या नातेवाईकाशी आर्थिक कारणावरुन मतभेद होण्याची शक्यता आहे. व्यवसायात काही अडथळे येऊ शकतात. पती-पत्नी सुसंवाद राखतील.

वृषभ राशी

कठोर परिश्रमाच्‍या जोरावर यश प्राप्‍त कराल. मानसिक आणि आध्यात्मिक शांती अनुभवाल. नकारात्मक परिस्थितीत तुमचा धैर्य राखा. स्वतःला सकारात्मक कामांमध्ये व्यस्त ठेवू शकता. व्यावसायिक कामांमध्ये निष्काळजी राहू नका. जोडीदाराचा सल्ला आणि पाठिंबा तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

मिथुन राशी

गरजू व्यक्तीला मदत केल्याने तुम्हाला मानसिक शांती लाभेल. कुटुंबातील विवाहयोग्य सदस्यासाठी योग्य नातेसंबंध देखील येऊ शकतात. शुभचिंतकांच्या आशीर्वादाने तुमचे खास काम पूर्ण होऊ शकते. कोणत्याही महत्त्वाच्या संभाषणादरम्यान वाईट शब्दांचा वापरू नका. स्वभावात सौम्यता आणि सहजता ठेवा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. कमिशन, विमा, शेअर्स इत्यादींशी संबंधित व्यवसायात फायदा होऊ शकतो.

कर्क राशी

आज तुम्‍ही आत्‍मविश्‍वासने समस्‍यांवर उपाय शोधाल. चुकीच्या कामांपासून दूर राहा. आर्थिक प्रश्‍न प्रलंबित राहण्‍याची शक्‍यता. खोट्या वादांपासून दूर राहा. व्यवसायात तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे यश मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील, असे श्रीगणेश म्‍हणतात.

सिंह राशी

सकारात्‍मक विचार तुमच्या व्यक्तिमत्त्वात अधिक प्रभावी होईल. कोणाकडूनही मदतीची अपेक्षा करू नका. स्वतःहून कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला योग्य परिणाम मिळू शकतो. कोणावरही जास्त विश्वास ठेवणे योग्य नाही. इतरांच्या सल्ल्याने तुमचे नुकसान होऊ शकते. व्यवसायात गुंतवणूक करताना काळजी घ्‍या. वैवाहिक जीवन आनंदी राहिल.

कन्या राशी

श्रीगणेश म्हणतात की, कुटुंबातील ज्‍येष्‍ठांचा अनुभव आणि मार्गदर्शनाचा आदर केल्‍यास तुमच्या विचारसरणीत सकारात्मक बदल होईल. तुम्हाला कोणत्याही चिंतांपासून मुक्तता मिळू शकते. बेकायदेशीर प्रकरणांपासून दूर रहा. मुलांची कोणतीही कृती तुमचा स्वाभिमान दुखावू शकते; परंतु शांतपणे परिस्थितीवर तोडगा काढा. दैनंदिन उत्पन्न पूर्वीपेक्षा चांगले असू शकते. वैवाहिक नाते गोड ठेवण्यासाठी पती-पत्‍नीमध्‍ये सुसंवाद आवश्यक आहे.

तुळ राशी

श्रीगणेश सांगतात की, आज घेतलाला निर्णय तुमच्‍यासाठी लाभदायक ठरेल. काही काळापासून सुरू असलेल्या कंटाळवाण्या दिनचर्येतून आराम मिळू शकेल. सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी उत्तम साहित्य वाचा. कार्यक्षेत्रात तुमचे पूर्ण नियंत्रण असू शकते. घरात लहान-मोठ्या गोष्टींना जास्त महत्त्व देऊ नका. दैनंदिन दिनचर्या व्यवस्थित ठेवल्याने तुम्ही निरोगी राहाल.

वृश्चिक राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, आज दिवसाची सुरुवात खूप सकारात्मक असेल. कामाची सुरुवात नियोजनानुसार होईल. काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे संतुलन साधणे आव्हानात्मक असेल. तुम्ही प्रत्येक काम योग्यरित्या पूर्ण करू शकाल. काही जवळचे लोक तुमच्या कामात व्यत्यय आणू शकतात. निष्काळजी राहू नका. विद्यार्थी वर्ग अभ्यासात व्यस्त राहतील. कठोर परिश्रमाने आर्थिक स्थिती सामान्य ठेवाल. कुटुंबातील सदस्यांसाठी भेटवस्तू खरेदी करू शकता.

धनु राशी

श्रीगणेश सांगतात की, आज तुम्हाला एखादी चांगली संधी उपलब्‍ध होवू शकते. अनोळखी व्यक्तीशी झालेली भेट फायदेशीर ठरेल. इतरांकडून अपेक्षा करण्याऐवजी स्वतःच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवा. तरुणांनी निरर्थक चर्चेपेक्षा आपल्‍या करीअरवर लक्ष केंद्रीत करावे. जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवरून सौम्य वाद होऊ शकतो.

मकर राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. भावनिकदृष्ट्या कोणताही निर्णय घेऊ नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. जवळच्या व्यक्तीमुळे तुमच्या समस्येचे कारण बनू शकते, याची जाणीव ठेवा. मार्केटिंग व्यवसायाशी संबंधित नवीन माहिती मिळू शकते. पती-पत्नीमध्ये योग्य सुसंवाद राखला जाईल.

कुंभ राशी

आज तुमच्‍या संपर्क क्षेत्रात वाढ होईल. अनुभवी लोकांशी झालेल्‍या भेटीचा तुमच्या व्यक्तिमत्त्वावरही सकारात्मक परिणाम होऊ शकतो. मित्राला मदत करावी लागेल. ओळखीच्या लोकांशी पत्रव्यवहार करताना वैयक्तिक काहीही उघड न करण्याची काळजी घ्या. व्यवसायात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. काम जास्त असले तरी कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवता येईल.

मीन राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, मागील काही दिवसांपासून सुरु असणार्‍या दगदगीतून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. कुटुंब आणि आर्थिक बाबींशी संबंधित महत्त्वाचे निर्णय देखील सकारात्मक असतील. ऑनलाइन शॉपिंग इत्यादी करताना तुमचे बजेटचा विचार करा. व्यावसायिक कामे पूर्वीसारखीच सुरू राहतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहिल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!