ध्यास विश्वसार्ह बातमीचा

थकित महसूल वसुलीसाठी जिल्हा प्रशासनाकडून मोहिम

सोलापूर, दि.10 : राज्य शासनाचा महसूल न भरणाऱ्या विविध व्यक्ती, सहकारी संस्था, खासगी संस्था, सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्या यांच्याकडून थकित रकमांच्या वसुलीची धडक मोहिम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भरत वाघमारे यांनी आज दिली.

त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमामधील विविध कलमानुसार महसुली अधिकाऱ्यांना विविध संस्थांकडून महसुल वसूल करण्याचे अधिकार आहेत. यानुसार जिल्हा प्रशासनाने ही धडक मोहिम हाती घेतली आहे. संस्था व्यक्तींनी विहीत मुदतीत थकीत महसुल न भरल्यास संस्थांवर कारवाई करणार आहे. यासाठी विविध संस्थांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. विहीत मुदतीत थकित न भरल्यास संस्थांच्या मालमत्ता ताब्यात घेतल्या जाणार आहेत. तसेच गरज भासल्यास मालमत्तांची विक्री देखील केली जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!