---Advertisement---

दुधनी लायन्स क्लबचा पद्ग्रहण सोहळा उत्साहात; अध्यक्षपदी संतोष जोगदे

Follow Us:
---Advertisement---

गुरुशांत माशाळ,

दुधनी, दि.१० : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे लायन्स क्लब ऑफ दुधनी शाखेचे उद्घाटन आणि सनद प्रदान सोहळा प्रांतपाल अण्णासाहेब गळतगे यांच्या हस्ते पार पडला. नूतन अध्यक्ष संतोष जोगदे व संचालक मंडळ यांना द्वितीय उपप्रांतपाल राजशेखर कापसे यांनी शपथ दिली. पदग्रहण सोहळा प्रथम उपप्रांतपाल सुनील सुतार यांच्या हस्ते पार पडला.

या कार्यक्रमास दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, नगराध्यक्ष भीमाशंकर इंगळे यांच्यासह बहुप्रांतीय उपसभापती जितेंद्र दोशी, विभागीय सभापती अभिजित जोशी, उपविभागीय सभापती महेश कारंडे, डॉ. नारायणदास चंडक, डॉ. गुलाबचंद शहा, गुलाबचंद कासलीवाल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

लायन्स क्लब एक सेवाभावी समाज कार्य करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे.त्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असतात. दुधनी मध्ये याची स्थापना झाली त्याचा आनंद होत आहे, असे प्रांतपाल अण्णासाहेब गळतगे यांनी सांगितले. यावेळी सभापती प्रथमेश म्हेत्रे, दुधनी नगरपरिषदेचे नगरध्यक्ष भिमाशंकर ईंगळे यांनी नूतन अध्यक्ष व पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी अध्यक्ष किरण कराळे, सचिव बाललिंग श्रीचीप्पा, अमित आळंगे, एम.के पाटील, महेश नळे, श्रीनिवास पुजारी, सिद्धेश्वर मंदिर समितिचे अध्यक्ष चंद्रकांत येगदी, रामचंद्र बिराजदार, शिवशरणप्पा हबशी, राजशेखर दोशी, सिद्धाराम येगदी, राजशेखर कौची, काशिनाथ गाडी, भीमाशंकर अल्लापुर, मल्लिनाथ येगदी, प्रशांत लोणी,  शिवराज गूळगोंडा, महांतेश पाटील, शिवकुमार गुडडोडगी, शिवकुमार कल्याणशेट्टी, शंकरलिंग पादी, संतोष अमाणे, यशवंत हौदे, महांतेश बिराजदार, लिंगराज उप्पीन, प्रदीप हबसी, इरय्या पुराणीक, विश्वनाथ गंगावती, बसवराज बिदनुर, चन्नु भांजीसह इतर अन्य मान्यवर उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!