पंतप्रधान मोदींचा शनिवारी पुणे दौरा; कोरोना लस निर्मात्या ‘सीरम’ला देणार भेट

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 28 नोव्हेंबरला पुण्यात येणार आहेत. त्याच दिवशी ते सिरम इन्स्टिट्यूला भेट देणार आहेत. दुपारी 1 ते 2 या दरम्यान मोदी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये लसीच्या निर्मितीबाबत माहिती घेतील. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी तयारी सुरू झाल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानंतर 4 डिसेंबरला 100 देशांचे … Read more

मनुके खाण्याचे हे आश्चर्यकारक फायदे वाचून तुम्हीसुद्धा चकित व्हाल

मनुके आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. मनुका हिवाळ्यात खाणे अधिक फायद्याचे असते.  मनुका दिसायला छोट्या परंतु शरीरासाठी भरपूर लाभदायक आहेत. आयुर्वेदामध्ये मनुकांना उपयुक्त औषधी मानले गेले आहे.  सुके मनुके खाण्यापेक्षा भिजवलेले मनुके खाल्ल्याने फायदे होतात. भिजवलेल्या मनुक्यांमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम तसेच फायबरचे प्रमाण भरपूर असते. रोज सकाळी उठून ५ मनुके खा. त्यावर कोमट पाणी प्या. मनुक्यांमध्ये … Read more

वाढीव वीजबिलांविरोधात मनसे आक्रमक ; ठाणे, पुण्यातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई : वीज बिलांच्या विरोधात मनसेने गुरूवारी राज्यभरात ‘झटका मोर्चा’चं आयोजन केलं आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक अशा विविध जिल्ह्यात मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. या दरम्यान, मनसेने काढलेल्या ठाण्यातील धडक मोर्चेला पोलिसांनी अडवले. त्यानंतर नेते अविनाथ जाधव, अभिजीत पानसे यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मनसेची मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू आहे. ‘सरकारच्या दडपशाहीला … Read more

जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे लागेन ; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा

मुंबई | महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. त्याचा पहिला प्रोमो  राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. दरम्यान, या प्रोमोमध्ये  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता अगदी जबरदस्त शैलीत भाजपवर निशाणा साधला आहे. जास्त अंगावर याल तर मी हात … Read more

सरनाईकांच्या अडचणीत वाढ? व्यावसायिक भागीदार अमित चांदोळेंना ईडीकडून अटक

मुंबई :  शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या अमित चांदोळे यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. चांदोळे टॉप्स ग्रुपचे भागीदार असल्याची माहिती आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अमित चांदोळे यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)अटक केली आहे.  अमित चांदोळे यांच्या अटकेनंतर आता प्रताप सरनाईकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टॉप्स सिक्युरिटी या खासगी … Read more

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर एसटी बसचा भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, 16 जण गंभीर

रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. पनवेलजवळ झालेल्या या भीषण अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर नवी मुंबईच्या कामोठे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एसटी बस साताऱ्याहून मुंबईकडे येत असताना हा अपघात झाला आहे. … Read more

रोजगाराच्या मागणीप्रमाणे तरुणांना प्रशिक्षित करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक तरुणाचे रोजगार गेले आहेत. आता या पार्श्वभूमीवर नव्याने रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत त्याप्रमाणे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने नवीन मागणीप्रमाणे तरुणांना प्रशिक्षित तयार करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. वर्षा निवासस्थानी आज कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सादरीकरण झाले त्यावेळी श्री ठाकरे … Read more

सोन्याच्या-चांदीच्या किंमती घसरण झाल्यानंतर पुन्हा वाढल्या ; जाणून घ्या नव्या किंमती

मुंबई : मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यानंतर आज सोन्या-चांदीच्या किंमती पुन्हा वाढल्या आहेत. आज बुधवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे द किरकोळ 45 रुपयांनी वाढले, तर चांदीच्या भावात 407 रुपयांनी वाढ झाली आहे. यापूर्वी मंगळवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 48,228 रुपयांवर बंद झाले होते. मंगळवारी चांदी 58,973 रुपये … Read more

राज्यातील सीमांवर आजपासून नाकेबंदी

मुंबई । देशातील विविध राज्यांमध्ये कोरोनाने डोख वर काढले आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत नवे निर्देश जाहीर करण्यात आले असून यात देशांतर्गत विमान, रेल्वे आणि रस्ते प्रवास करुन महाराष्ट्रात प्रवेशासाठी एसओपी जारी करण्यात आली आहे. आजपासून राज्यात या नियमांची अमंलबजावणी सुरु होणार आहे. त्यानुसार … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी घेवून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडा-मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग

पुणे  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी घेवून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडा, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी दिल्या. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांच्या निवडणूक विषयक पूर्व तयारीचा आढावा घेतला. यावेळी सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल … Read more