ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चप्‍पळगावमधील चोरीच्या घटनेनंतर पोलिसांकडून खबरदारीचे आवाहन

अक्कलकोट, दि.१३ : अक्कलकोट तालुक्याच्या उत्तर भागात बुधवारी चपळगाव येथे चोरीचा प्रकार घडल्याने पोलीस अलर्ट झाले असून नागरिकांनाही त्यांनी दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे.याबाबत स्वतः पोलीस निरीक्षक गोपाळ पवार हे परिसरातील ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन ते करत आहेत.

चप्‍पळगाव येथे सात ते आठ घरफोड्या झाले असून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे त्याच अनुषंगाने आपल्या गावात सतर्क किंवा हुशारीने राहणे गरजेचे आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आणि उकाडा जास्त असल्याने लोक हवेशीर जागा झोपण्यासाठी निवडत असतात त्यामुळे घराकडे रात्रीच्या वेळी दुर्लक्ष होते असे न करता सर्वांनी दक्ष राहून आपल्या गावांमध्ये किंवा घरांमध्ये कोणत्याही प्रकारचा विचित्र प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत,असे आवाहन परिसरातील ग्रामस्थांना केले आहे.

दहिटणे, चपळगाव येथे जाऊन पोलीस निरीक्षक गोपाळ पवार व गोपनिय खात्याचे धनराज शिंदे यांनी गावातील सर्व नागरिकांना दक्ष आणि काळजीपूर्वक राहण्याचे आवाहन केले
आहे.

★ पोलीसांनी तपास लवकर लावावा

मागच्या अनेक दिवसात अशी घटना चपळगाव मध्ये घडली नव्हती. याचा तपास पोलीस यंत्रणेने लवकरात लवकर लावून संबंधितांना त्वरित अटक करावे. याबाबत आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने देखील मोठी खबरदारी घेत आहोत – उमेश पाटील,सरपंच चपळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!