ध्यास विश्वसार्ह बातमीचा

देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्याची जबाबदारी ही सीबीआयची ; सीबीआयच्या हीरकमहोत्सवी कार्यक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

दिल्ली : सीबीआयच्या हीरकमहोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्याची जबाबदारी ही सीबीआयची आहे असे सांगून त्यांना बेधडक कारवाई करण्याचा सल्ला देखील दिली आहे. देशाला भ्रष्टाचारमुक्त करणे ही प्रामुख्याने सीबीआयची जबाबदारी आहे. या साठी सीबीआयने देशात बेधडक कारवाई करावी. कोणाच्याही दबावाला बळी न पडता, समोर कोण आहे हे पाहून थांबण्याची गरज नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. देशात सुरू असलेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘लोकशाही आणि न्यायाच्या मार्गातील भ्रष्टाचार हा सर्वात मोठा अडथळा आहे. भ्रष्टाचाराशी लढण्यासाठी आमच्या सरकारकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव नाही. आम्ही काळा पैसा, बेनामी मालमत्तेविरुद्ध कारवाई तीव्र केली आहे. भ्रष्टाचार का होतो, यावरही आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. विकसित भारताची निर्मिती व्यावसायिक आणि कार्यक्षम संस्थांशिवाय शक्य नाही. यासाठी सीबीआयवर मोठी जबाबदारी आहे’ असे ते म्हणाले.

‘कोणत्याही भ्रष्टाचाऱ्याला सोडायचे नाही. १० वर्षांपूर्वी अधिकाधिक भ्रष्टाचार करण्याची जणू स्पर्धाच लागली होती. त्या काळात मोठमोठे घोटाळे झाले. परंतु आरोपी घाबरले नाहीत. यंत्रणा त्यांच्या पाठीशी उभी राहिली. २०१४ नंतर आम्ही भ्रष्टाचार, काळ्या पैशाविरोधात मिशन मोडमध्ये काम सुरू केले. यामुळे आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे,’ आजही एखाद्या प्रकरणाची उकल होत नसेल, तर ते सीबीआयकडे देण्याची मागणी होते. सीबीआयने त्यांच्या कार्यशैलीने लोकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. तुम्ही कोणाविरोधात कारवाई करत आहात हे मला माहीत आहे. ते अतिशय शक्तिशाली लोक आहेत. ते वर्षानुवर्षे सरकार आणि व्यवस्थेचा भाग आहेत. आजही अनेक राज्यांमध्ये ते सत्तेचा भाग आहेत. परंतु, याचा विचार तुम्ही करू नका. तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असं मोदी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!