ओडिशा : बालासोरमध्ये झालेल्या रेल्वे अपघात प्रकरणी सीबीआयने काल मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने या प्रकरणी रेल्वेच्या तीन अधिकाऱ्यांना अटक केली आहे. सेक्शन इंजीनिअर मोहम्मद आमिर खान, अरुण कुमार मोहंता आणि टेक्नीशियन पप्पू कुमार यांना सीआरपीसी कलम ३०४ व २०१ नुसार अटक केली आहे.
२ जून २०२३ रोजी रात्रीच्या सुमारास ओडिशा राज्यातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्टेशनवर उभी असलेली एक मालगाडी आणि दोन एक्सप्रेस ट्रेन दुर्घटनाग्रस्त झाल्या होत्या. यामध्ये पश्चिम बंगालमधील शालिमारहून चेन्नईकडे जात असलेली कोरोमंडल एक्सप्रेस, बेंगळुरु – हावड़ा सुपरफास्ट एक्सप्रेस आणि एका मालगाडीचा समावेश होता. या अपघातात २९३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर एक हजाराहून अधिक लोक जखमी झाले होते