---Advertisement---

अमरावतीत भाजप आमदाराच्या बहिणीवर प्राणघातक हल्ला

By team
On: November 19, 2024 12:00 PM
Follow Us:
---Advertisement---

अमरावती वृत्तसंस्था 

काल सोमवारी रात्री शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक झाल्याची घटना ताजी असताना अमरावतीमध्ये भाजप आमदाराच्या बहिणीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.

अमरावतीच्या धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार प्रताप अडसड यांच्या बहिणीवर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. सातेफळ फाट्यावरून जात असताना हल्लेखोरांनी गाडीवर हल्ला चढवला. या हल्ल्यात आमदार प्रताप अडसळ यांची बहीण अर्चना रोठे जखमी झाल्या आहे. त्यांच्या हातावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहे. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान कार्यकर्त्यांनी शांत राहण्याचं आवाहन आमदार प्रताप अडसड यांनी केलं आहे. चांदूर रेल्वे येथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना अमरावती हलवण्यात आलं आहे. या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली असून अधिक तपास करत आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!